‘आदिपुरुष’चे डॉयलॉग लिहिणाऱ्या मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे मागितले संरक्षण!

WhatsApp Group

Adipurush : आदिपुरुष चित्रपटावर गोंधळ सुरूच आहे. आदिपुरुषमध्ये दाखवलेल्या संवादांबाबत देशभरात निदर्शने होत आहेत. दरम्यान, चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. या गदारोळात मनोज मुंतशीर यांनी स्वत:ला धोक्याची भीती व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. मुंतशीर /यांच्या अर्जावर विचार करून मुंबई पोलीस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट आदिपुरुष शुक्रवारी म्हणजेच 16 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र आदिपुरुषमध्ये दाखवलेल्या संवादांबाबतही देशभरात निषेध व्यक्त होत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत.

हेही वाचा – “पाकिस्तानचं क्रिकेट भारतापेक्षा चांगलंय…”, वर्ल्डकपपूर्वी जावेद मियांदादनं ओकलं विष!

चित्रपटातील या संवादांचा निषेध

  • हनुमान लंकेत गेल्यावर एका राक्षसाने त्यांना पाहिले आणि विचारले, ”ये लंका क्या तेरी बुआ का बगीचा है, जो हवा खाने चला आया.”
  • सीतेला भेटल्यानंतर हनुमानाला लंकेत राक्षसांनी पकडले तेव्हा मेघनाथ त्यांच्या शेपटीला आग लावून विचारतो, ”जली?”. प्रत्युत्तरात हनुमान म्हणतात, “तेल तेरे बाप का. कपड़ा तेरे बाप का. और जलेगी भी तेरे बाप की.”
  • जेव्हा हनुमान लंकेहून परत येतात आणि राम त्यांना विचारतात काय झाले? याला उत्तर देताना हनुमान म्हणतात, ”बोल दिया, जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे.”
  • लक्ष्मणावर हल्ला करताना इंद्रजित एका ठिकाणी म्हणतो, “मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेष नाग को लंबा कर दिया. अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है.”

चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

आदिपुरुष चित्रपटाला देशभरातून विरोध होत आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यांवर होत आहे. संत समाजही या चित्रपटाविरोधात उघडपणे उतरला असून बंदीची मागणी करत आहे. एवढेच नाही तर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचे नेतेही या चित्रपटाला विरोध करत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यावर केंद्र सरकारकडूनही कडक टीका करण्यात आली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment