Adipurush : आदिपुरुषचे डायलॉग्ज बदलले! आता हनुमानजी बोलणार, “कपडा तेरी…”

WhatsApp Group

Adipurush Dialogues Changed : “कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की….” आदिपुरुषमधील हनुमानच्या तोंडचे हे डायलॉग्ज टीकेचा धनी ठरत आहेत. या चित्रपटातील मनोज मुंतशीर यांनी हे डायलॉग्ज लिहिले आहेत. वादात अडकलेले मनोज मुनताशीर यांनी आदिपुरुषचे डायलॉग्ज बदलण्याबाबत सांगितले होते. सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात आदिपुरुषचे डायलॉग्ज बदलण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांमध्ये जो उत्साह होता, तो पहिल्या दिवशीच कायम राहिला. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटात रावण बनलेला सैफ अली खान पुष्पक विमानाऐवजी वटवाघळावर बसतो. हनुमान ‘तेल तेरे बाप का’ असे शब्द वापरतात. ही सर्व दृश्ये आणि असे संवाद ऐकल्यानंतर लोक आदिपुरुषचे निर्माते आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर संतापले. ‘आदिपुरुष’चे निर्माते देशभरात अडचणीत आले होते, त्यानंतर या चित्रपटाचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भगवान हनुमानाचे संवाद बदललेले दिसत आहेत.

‘आदिपुरुष’चे हे संवाद बदलले!

या चित्रपटाची एक छोटीशी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही क्लिप ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की…’ या दृश्याची आहे. शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, मेघनाद जेव्हा हनुमानजींच्या शेपटीला आग लावतात तेव्हा हनुमानजी म्हणतात, ‘कपडा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की, जलेगी भी तेरी लंका की.’

हेही वाचा  – VIDEO : भारत-पाकिस्तान मॅचमध्ये भयंकर राडा, मैदानावर भिडले खेळाडू!

बॉक्स ऑफिस कलेक्शन

आदिपुरुषच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्यात आधीच मोठी घसरण नोंदवली गेली आहे. 16 जून रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 140 कोटींचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले. पण जसजसा दिवस सरत गेला तसतशी ‘आदिपुरुष’ची कमाई रविवारच्या तुलनेत 75% पेक्षा जास्त कमी झाली. रविवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 69 कोटींची कमाई केली. सकनिल्‍कच्‍या अहवालानुसार सोमवारी चित्रपटाचे कलेक्‍शन केवळ 16 कोटी रुपये होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment