

Parag Kansara Passes Away : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनातून चाहत्यांना सावरता आले नाही की, आता कॉमेडी जगतातून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एका कॉमेडियनने जगाचा निरोप घेतला आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज फेम कॉमेडियन पराग कंसारा यांचे राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर निधन झाले. पराग कंसारा यांनी ६ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला.
कॉमेडियन सुनील पाल यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पराग कंसारा यांच्या निधनाची माहिती दिली. कॉमेडियन सुनील पाल यांनी इन्स्टा वर एक व्हिडिओ जारी केला की, “हॅलो मित्रांनो, कॉमेडीच्या जगातून आणखी एक धक्कादायक आणि वाईट बातमी समोर आली आहे. आमचे लाफ्टर चॅलेंज पार्टनर पराग कंसारा जी, या जगात नाही आहेत, होय. पराग कंसारा जो, जे सरळ कॉमेडी करायचे, प्रत्येक गोष्टीचा उलटा विचार करायचे आणि आम्ही हसायचो.”
हेही वाचा – भारतात बनवलेलं सर्दी-खोकल्याचं सिरप प्यायलानं ६६ मुलांचा मृत्यू..!
After the demise of well-known comedian #RajuSrivastava, #ParagKansara of 'The Great Indian Laughter Challenge' fame passed away on Wednesday. He was 51.
His industry friend and popular stand-up comedian, Sunil Pal took to his Instagram handle to share this sad news. pic.twitter.com/JCyRt5lCsB
— IANS (@ians_india) October 6, 2022
सुनील पाल यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही महिन्यांत सातत्याने होणाऱ्या मृत्यूंबाबतही सांगितले. सुनील पाल म्हणाले, ”हे काय आहे? कॉमेडीच्या दुनियेला कुणाची नजर लागली? सगळ्यांना हसवणाऱ्यांचे कुटुंबीय या दु:खात का जात आहेत, हेच कळत नाही. अलीकडे आम्ही राजूभाई गमावले आणि एकामागून एक, आम्ही विनोदाचे सर्व आधारस्तंभ गमावत आहोत.” व्हिडिओमध्ये सुनील पाल यांना दीपेश भानचीही आठवण येते.
कोण होते कॉमेडियन पराग कंसारा?
कॉमेडियन पराग कंसारा हे गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी होते. पराग कंसारा टीव्हीच्या प्रसिद्ध शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सीझनचा स्पर्धकही होते. पराग यांचे कॉमेडी शो फक्त टीव्हीवरच नाही तर बाहेरही लोकांना आवडायचे. परागने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ नंतर अनेक कॉमेडी शो केले. त्यांच्या आकस्मिक निधनाने विनोदी विश्वात शोककळा पसरली आहे.