‘ही’ बातमी वाचून तुमचं अक्षय कुमारवर प्रेम आणखीन वाढेल!

WhatsApp Group

Akshay Kumar Stuntman Insurance : चित्रपटांमध्ये दिसणारे स्टंट्स मोठ्या पडद्यावर जितके थरारक आणि सोपे वाटतात, प्रत्यक्षात ते तितकेच धोकादायक असतात. अलीकडेच दिग्दर्शक पी. रंजीत यांच्या तमिळ चित्रपटाच्या सेटवर स्टंटमॅन राजू याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. देशभरातील स्टंट आर्टिस्ट्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा खऱ्या अर्थाने अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमार पुढे आले आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

स्टंट आर्टिस्ट्ससाठी मोठी मदत – इन्शुरन्सची सुरुवात

अक्षय कुमार स्वतः आपल्या बहुतेक स्टंट्स स्वतः करतात. बॉडी डबलचा वापर फारच कमी वेळा केला जातो. स्टंटमॅन राजूच्या मृत्यूनंतर अक्षयने भारतातील सुमारे ६५० ते ७०० स्टंटमॅन्सचे हेल्थ आणि अ‍ॅक्सिडेंट इन्शुरन्स करून दिले आहेत. या उपक्रमाबद्दल माहिती देताना प्रसिद्ध अ‍ॅक्शन डायरेक्टर विक्रम सिंह दहिया यांनी सांगितले की, “ही योजना याआधी अस्तित्वात नव्हती. अक्षय कुमारने याची सुरूवात केली आणि आर्थिक मदतही केली. त्यांना माहिती आहे की स्टंटमॅन्सचे जीवन किती संघर्षमय असते.”

हेही वाचा – डॉली चहावाल्याची फ्रेंचायझी लाँच, 1600 पेक्षा अधिकांचा अर्ज, पण फक्त काहींनाच मिळणार..

२०१७ पासून मदतीचा हात

फिल्म स्टंट आर्टिस्ट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी एजाज खान यांनीही अक्षयच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. ते म्हणाले, “अक्षय कुमार गेल्या ८ वर्षांपासून (२०१७ पासून) स्टंट आर्टिस्ट्सच्या सुरक्षेसाठी कार्य करत आहेत.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment