Andhra Pradesh Burglary Case : आलिशान जीवनशैली जगण्याच्या हव्यासातून एका सुशिक्षित तरुणाने थेट गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशात उघडकीस आला आहे. विशाखापट्टणम आणि राज्यातील इतर भागांमध्ये सलग घरफोड्या करणाऱ्या 27 वर्षीय माजी आयटी व्यावसायिकाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
अच्छी महेश रेड्डी ऊर्फ सनी असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा काकीनाडा येथील रहिवासी आहे. सध्या तो विशाखापट्टणममधील माधवधारा परिसरात राहत होता. सनी हा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असून, हैदराबादमधील एका नामांकित आयटी कंपनीत तो पूर्वी कार्यरत होता. मात्र, ऐषआरामाची जीवनशैली, लक्झरी कार आणि परदेश प्रवास यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
26 घरफोड्या उघडकीस, कोट्यवधींचा ऐवज जप्त
सनीच्या अटकेनंतर विशाखापट्टणम शहरातील गाजुवाका, अरिलोवा, मलकापूरम, पेंडुर्थी आणि दुव्वाडा या भागांतील एकूण 26 घरफोडी प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये चोरट्यांनी सुमारे 24.66 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
"Hyderabad IT employee turned burglar arrested in Vizag for 26 house break-ins! Achhi Mahesh Reddy, aka Sunny, used stolen loot to fund lavish lifestyle, including BMW car & international trips. 699g gold, 3.8kg silver & BMW car seized.
— RSB NEWS 9 (@ShabazBaba) February 9, 2026
1/2 pic.twitter.com/VKJNYr3odj
यामध्ये 1,084 ग्रॅमपेक्षा अधिक सोन्याचे दागिने, 6,300 ग्रॅमपेक्षा जास्त चांदीचे दागिने आणि 40,500 रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे.
अटकेदरम्यान पोलिसांनी सुमारे 699 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3.8 किलो चांदीचे दागिने, चोरीच्या पैशातून खरेदी केलेली आलिशान BMW कार, क्रमांक नसलेली दुचाकी आणि घरफोडीसाठी वापरण्यात येणारी विविध साधने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 15.63 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
किशोरवयातच गुन्हेगारीची सुरुवात
विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त शंकर ब्रत बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनीचा गुन्हेगारी इतिहास अत्यंत जुना आहे. अवघ्या 15व्या वर्षी तो पीएम पालेम परिसरात घरफोडी करताना पकडला गेला होता. त्यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.
सुधारगृहातून सुटल्यानंतरही त्याने गुन्हेगारी सोडली नाही. काकीनाडा, सरपवरम, रामचंद्रपुरम, इंद्रपालेम आणि राजमुंद्री परिसरात त्याने सातत्याने घरफोड्या केल्या. याच प्रकरणांमध्ये त्याला 14 महिने राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगावी लागली होती. पोलिस नोंदींनुसार, सनी राज्यभरात 60 पेक्षा अधिक घरफोडी प्रकरणांमध्ये सहभागी होता.
हायटेक पद्धतीने चोरी, पोलिसांचा तपास सुरू
तपासात असेही उघड झाले आहे की, सनी चोरी करताना मुखवटे, टोपी, हातमोजे वापरत असे. घरफोडीसाठी तो हातोडे, स्क्रू ड्रायव्हर, ड्रिल मशिन यांसारखी आधुनिक साधने वापरत होता. सर्व संबंधित प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा