बंधन बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास स्कीम, FD वर आकर्षक व्याज, सोबत ‘हे’ बेनिफिट्स!

WhatsApp Group

खासगी क्षेत्रातील बंधन बँकेने नववर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. बंधन बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन सुविधा सुरू करण्याची घोषणा केली. बँकेने ‘INSPIRE’ सुरू केले आहे ज्या अंतर्गत 500 दिवसांच्या मुदत ठेवींवर वार्षिक 8.35% व्याज दिले जाईल (Bandhan Bank INSPIRE Programme).

बँकेने निवेदनात म्हटले आहे की, ‘INSPIRE’ आरोग्य सेवा फायद्यांसह प्रगत बँकिंग अनुभव देखील देईल. हे बँकेच्या ‘ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना’ प्राधान्य व्याजदर, प्राधान्य बँकिंग सेवा आणि डोअर स्टेप बँकिंग सुविधा यासारखे विद्यमान फायदे विस्तारित करेल.

बंधन बँकेचे शाखा बँकिंग प्रमुख सुजॉय रॉय म्हणाले, आम्ही प्रत्येक वयात आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व आणि गरज ओळखतो. बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी ही काळजीपूर्वक डिझाइन केलेली लाभ ऑफर घेऊन आली आहे.

बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर आकर्षक व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिक 500 दिवसांच्या कालावधीसाठी FD वर 8.35% व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. बँकेने म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिक करबचत एफडीसाठी 7.5% व्याजदराचा लाभ घेऊ शकतात.

हेही वाचा – एक वंदे भारत ट्रेन बनवायला किती खर्च येतो? किती कमाई होते?

बंधन बँकेने सांगितले, की ‘INSPIRE’ कार्यक्रम औषधांच्या खरेदीवर, डायग्नेस्टिक सव्हिर्सेज आणि मेडिकल ट्रीटमेंटवर विशेष सवलत प्रदान करतो. याव्यतिरिक्त, पार्टनर हेल्थकेयर सर्व्हिस प्रोव्हायडर्सद्वारे डॉक्टरांचा सल्ला, मेडिकल चेक-अप्स आणि डेन्टल केयर यावर सवलती देखील प्रदान केल्या जातात. ज्येष्ठ नागरिक ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुलभ करण्यासाठी फोन बँकिंग अधिकाऱ्यापर्यंत थेट प्रवेश यासारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये जोडण्याचीही बँकेची योजना आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment