BBC Fake News : जगप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारमाध्यम BBC सध्या मोठ्या विवादात सापडले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात एडिट करून लोकांना दिशाभूल केल्याचा आरोप BBC वर झाल्यानंतर संस्थेचे दोन सर्वोच्च अधिकारी डायरेक्टर जनरल टिम डेवी (Tim Davie) आणि न्यूज CEO डेबोरा टर्नेस (Deborah Turness) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
हा राजीनामा तेव्हाच आला आहे, जेव्हा BBC वर निष्पक्षतेच्या अभावाचे आरोप झाले. विशेषतः इस्त्रायल-हमास युद्ध आणि ट्रान्सजेंडर विषयक रिपोर्टिंग संदर्भात.
NEW: BBC to apologize for deceptively editing President Trump’s January 6 speech in an effort to make it look like he encouraged violence at the Capitol.
— Collin Rugg (@CollinRugg) November 9, 2025
The apology letter is reportedly expected to come early next week.
“Samir Shah, the BBC’s chairman, will write to the… pic.twitter.com/cJixU8mSDD
वादाची पार्श्वभूमी
इंडिया टुडेच्या अहवालानुसार, 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्या कॅपिटल बिल्डिंगमध्ये ट्रम्प समर्थकांनी गोंधळ घातला होता. या घटनेपूर्वी ट्रम्प यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी आपले समर्थक शांततेने निदर्शन करावीत असे म्हटले होते. मात्र, आरोप असा आहे की BBC ने या भाषणाचे एडिट केलेले व्हर्जन दाखवले, ज्यातून प्रेक्षकांना असा भास झाला की ट्रम्प यांनी दंगलीस प्रवृत्त केले.
‘पॅनोरामा’ कार्यक्रमात बदल?
‘द टेलिग्राफ’च्या अहवालानुसार, BBC च्या लोकप्रिय कार्यक्रम ‘Panorama’ मध्ये ट्रम्पच्या भाषणाचे काही भाग जोडून असा भास निर्माण करण्यात आला की त्यांनी समर्थकांना “पूर्ण ताकदीने लढा” असे आवाहन केले. या प्रकारामुळे BBC वर जनतेला दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
I'm glad the US President and the rest of the world are seeing the BBC for what it is.
— Liz Truss (@trussliz) November 9, 2025
Its failure to tell the truth on everything from transgender ideology to economics to Gaza has done huge damage to politics and government in this country.
This should be the end of… pic.twitter.com/3pnUAZojnc
तसेच, ‘BBC Arabic’ ने गाझा युद्धाबद्दल केलेली रिपोर्टिंग पक्षपाती असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही कर्मचाऱ्यांनी ट्रान्सजेंडर विषयावरील काही कठीण प्रश्न दडपून टाकल्याचा दावा देखील करण्यात आला.
BBC चे स्पष्टीकरण
डायरेक्टर जनरल टिम डेवी यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल बोलताना म्हटले की, “हा वैयक्तिक निर्णय आहे आणि BBC बोर्डाकडून कोणताही दबाव नाही. मात्र, अलीकडील वाद या निर्णयामागे एक महत्त्वाचा घटक आहे आणि मला त्याची जबाबदारी घ्यावीच लागेल.”
डेवी यांनी 2020 मध्ये DG पदभार स्वीकारला होता. BBC बोर्ड नवीन DG निवडेपर्यंत ते काही महिन्यांसाठी पदावर राहणार आहेत.
BBC च्या वेबसाइटवर CEO डेबोरा टर्नेस यांनीही मान्य केले की, “काही चुका झाल्या आहेत.” मात्र त्यांनी हेही नमूद केले की, “BBC संस्थात्मकरीत्या पक्षपाती आहे, हा आरोप चुकीचा आहे.”
ट्रम्पचा BBC वर हल्ला
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘Truth Social’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत BBC वर निशाणा साधला. त्यांनी लिहिले, “BBC चे शीर्ष अधिकारी, ज्यात बॉस टिम डेवी सुद्धा आहेत, सर्वांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी माझ्या भाषणात फेरफार करून खोटी कथा तयार केली. द टेलिग्राफचे आभार, ज्यांनी या भ्रष्ट पत्रकारांना बेनकाब केले.”
व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनीही BBC वर “फेक न्यूज” पसरवल्याचा आरोप करत तिला “डाव्या विचारसरणीची प्रचारयंत्रणा” म्हटले.
BBC चा विश्वासार्हतेचा प्रश्न?
या घटनेनंतर BBC च्या निष्पक्षतेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. “फेक न्यूज” चा आरोप आणि शीर्ष अधिकार्यांचे राजीनामे यामुळे BBC साठी विश्वास पुनर्स्थापित करणे मोठे आव्हान ठरणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा