पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या BMW कारमधून 13 लाख चोरले, व्हिडिओ व्हायरल!

WhatsApp Group

Rs 13 lakh Stolen From BMW Car : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये चोरट्यांनी कारमध्ये ठेवलेले 13 लाख रुपये लंपास केले. चोरीची ही घटना सर्जापूर येथे घडली. येथे पार्किंगमध्ये एक बीएमडब्ल्यू कार उभी होती. त्यानंतर बाईकवर आलेल्या दोन तरुणांनी कारची काच फोडून त्यात ठेवलेले 13 लाख रुपये चोरून नेले.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारची असल्याची माहिती आहे. सोमपुरा येथील उपनिबंधक कार्यालयाजवळ कार उभी होती. सर्जापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा – Digital Highways : भारतात ‘येथे’ होणार डिजिटल हायवे, हाय स्पीड सुविधांमुळे प्रवाशांची मजा!

समोर आलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुणांनी त्यांची बाईक पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारजवळ उभी केल्याचे दिसून येते. यानंतर एका दुचाकीस्वाराने खाली उतरून बीएमडब्ल्यू X5 कारची काच फोडली आणि त्यात ठेवलेले 13 लाख रुपये काढून तेथून पळ काढला.

ही कार बंगळुरूच्या अणेकल तालुक्यातील रहिवासी बाबूची असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment