Brain Dead Pregnant Woman : अमेरिकेतून आलेली ही घटना माणुसकी, कायदा आणि वैद्यकीय नीती यांच्यातील संघर्षाचं थरारक उदाहरण ठरत आहे. जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरात राहणारी 31 वर्षांची एड्रियाना स्मिथ—जिचं शरीर जिवंत होतं, पण मेंदू पूर्णपणे मृत झाला होता… आणि तरीही तिच्या पोटात एक जीव श्वास घेत होता. ही कहाणी ऐकताना मन सुन्न होतं आणि डोळे पाणावतात.
अचानक आलेली वैद्यकीय आपत्ती
फेब्रुवारी 2025 मध्ये एड्रियाना नऊ आठवड्यांची गर्भवती होती. एका दिवशी तिला अचानक तीव्र डोकेदुखी जाणवली. डॉक्टरांकडून औषधं घेऊन ती घरी परतली, पण दुसऱ्याच दिवशी तिची प्रकृती अधिकच बिघडली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
रुग्णालयात नेल्यानंतर करण्यात आलेल्या CT Scan मध्ये तिच्या मेंदूत रक्ताच्या गाठी (Blood Clots) आढळून आल्या. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली, पण ती अयशस्वी ठरली. डॉक्टरांनी अखेर एड्रियानाला Brain Dead घोषित केलं—म्हणजे तिचा मेंदू कायमस्वरूपी काम करणे थांबले होते. सामान्य परिस्थितीत इथेच उपचार थांबले असते. पण ही केस सामान्य नव्हती.
कायद्याने कुटुंबाचे हात बांधले
जॉर्जिया राज्यात लागू असलेल्या Heartbeat Law मुळे ही केस संपूर्ण अमेरिकेत चर्चेचा विषय ठरली. या कायद्यानुसार, जर गर्भात बाळाच्या हृदयाचे ठोके आढळले, तर गर्भपात करण्यास मनाई आहे—म्हणजे आई ब्रेन डेड असली, तरीही!
याच कारणामुळे डॉक्टरांना एड्रियानाला Life Support वर ठेवणे बंधनकारक झाले. कुटुंबाची इच्छा, भावना किंवा निर्णय—कशालाही कायदेशीर मान्यता नव्हती. मृत घोषित झालेली मुलगी… मशीनवर जिवंत ठेवलेली आई… आणि पोटात वाढणारा एक निष्पाप जीव.
सी-सेक्शनद्वारे बाळाचा जन्म
जून 2025 मध्ये अखेर डॉक्टरांनी C-Section करून बाळाला जन्म दिला. या चिमुकल्याचं नाव ठेवण्यात आलं—Chance (चॅन्स) जन्मावेळी बाळाचं वजन फक्त 1 पाउंड 13 औंस इतकंच होतं. त्याला तातडीने NICU मध्ये हलवण्यात आलं. बाळ जन्माला आल्यानंतर, त्याच महिन्यात एड्रियानाला Life Support वरून हटवण्यात आलं आणि कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
आईसाठी ही यातना
एड्रियानाची आई एप्रिल न्यूकिर्क यांच्यासाठी हा काळ एखाद्या शिक्षेसारखा होता. त्या म्हणतात, “माझी मुलगी श्वास घेताना दिसत होती… पण ती तिथे होतीच नाही. ती फक्त मशीनवर होती.” आई म्हणून, आजी म्हणून या वेदनेला शब्दच नव्हते.
बाळ जिवंत आहे, पण प्रश्न कायम
आज चॅन्सचं वजन 11 पाउंड झाले आहे. तो अजूनही NICU मध्येच आहे. त्याला श्वसनाशी संबंधित त्रास आहेत आणि प्रकृती नाजूक आहे. एप्रिल न्यूकिर्क यांनी GoFundMe पेजवर भावना व्यक्त करत सांगितलं की, “सुट्ट्यांचा काळ आहे, पण आमचं मन फार जड आहे. आम्ही फक्त प्रार्थनांवर जगतोय.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा