

Indian Railways Cleanliness Audit : भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी असते ‘देशाची जीवनवाहिनी’, मात्र CAG च्या नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार ट्रेनमधील स्वच्छतेबाबतची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये घाण, पाण्याचा अभाव आणि कर्मचारी अपुरेपणा यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
CAG (नियंत्रक आणि महालेखा परीक्षक) यांचा हा अहवाल 2018-19 ते 2022-23 दरम्यान 96 निवडक लांब पल्ल्याच्या ट्रेन्समधील 2,426 प्रवाशांच्या अभिप्रायांवर आधारित आहे. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे:
टॉयलेटची दुर्दशा:
- 40% पेक्षा अधिक प्रवासी टॉयलेटच्या स्वच्छतेवर असमाधानी आहेत.
- 50% पेक्षा जास्त प्रवाशांनी एकूणच ट्रेनमधील घाण आणि अस्वच्छतेवर तक्रार केली आहे.
- स्लीपर कोचमधील टॉयलेट्समध्ये पाणी भरून सांडलेले, वॉशबेसिनवर जाम, गटारसदृश स्थिती आढळून आली.
- काही ट्रेनमध्ये दरवाज्यांजवळ साचलेला घाणपाणी देखील दिसून आला.
पाण्याचा अभाव — प्रवाशांची अडचण
CAG च्या अहवालानुसार, 15% प्रवाशांनी वॉशबेसिन आणि टॉयलेटमध्ये पाणी नसल्याची तक्रार केली आहे. 2022-23 मध्ये ‘रेल मदत’ अॅपवर पाण्याच्या कमतरतेसंबंधित 1 लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या.
हेही वाचा – दररोज ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! ‘हा’ पास घेतला की सहा महिने तिकीट नकोच; पैसे आणि वेळेची मोठी बचत
CTS योजनेचा फज्जा
स्वच्छ रेल्वेगाडी स्थानक (Clean Train Station – CTS) या योजनेतून ट्रेन थांबताना बायो-टॉयलेट्सची मशीनद्वारे सफाई केली जाणे अपेक्षित होते. पण 29 CTS स्थानकांपैकी अनेक ठिकाणी सफाई उपकरणांची कमतरता, कर्मचारी अपुरे आणि अर्धवट स्वच्छता ही गंभीर समस्या दिसून आली.
कर्मचारी आणि यंत्रसामग्रीचा अभाव:
- सफाई करणारे कर्मचारी अपुरे आहेत.
- रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील स्वच्छतेची तपासणी वेळेवर केली नाही, असेही अहवालात नमूद आहे.
- विशेष म्हणजे, उत्तर आणि उत्तर-मध्य रेल्वेमध्ये 90% प्रवासी समाधानी आढळले, तर पूर्व, पश्चिम आणि पूर्व तटीय रेल्वे झोनमध्ये 50% पेक्षा अधिक प्रवासी नाराज होते.
सुरक्षा प्रश्न — पोलीस पडताळणीही नाही!
कंत्राटी कामगारांची पोलीस पडताळणी योग्य पद्धतीने न केल्यामुळे, अशा काही कर्मचाऱ्यांकडून गंभीर गुन्हे घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. उदाहरणार्थ, दिल्ली-अहमदाबाद स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेसमध्ये अटेंडंटकडून प्रवाशावर बलात्कार झाल्याची नोंदही या रिपोर्टमध्ये आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा