AI कमावतोय पैसे, तुम्ही अजून विचारात? एक Reddit युजर बनला लाखोंचा मालक!

WhatsApp Group

ChatGPT Trading Success Story : सणासुदीच्या सुट्ट्यांमध्ये थंड कोल्ड्रिंकच्या घोटात रिलॅक्स होत असताना जर तुमचे पैसे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून वाढत असतील, तर आयुष्यात अजून काय हवं? अशीच काहीशी गोष्ट एका Reddit यूजरने शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

ChatGPT आणि Grok द्वारे शेअर ट्रेडिंगमध्ये यशस्वी प्रयोग

Reddit वर “Watching ChatGPT Make Me Money While I Chill and Crack a Cold One” या टायटलने एक यूजरने आपला अनुभव शेअर केला. त्याने फक्त $400 (₹33,000) गुंतवणुकीने Robinhood या प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग सुरू केलं.  ChatGPT आणि Elon Musk च्या Grok AI यांना भरपूर डेटा दिला गेला — स्प्रेडशीट्स, ऑप्शन चेन, चार्ट्स इत्यादी — आणि सांगितलं, “मला असे ट्रेड्स द्या, जे माझा BBQ आणि बिअरचा बजेट करोडोंत रूपांतरित करतील!”

हेही वाचा – मानवी त्वचेचा टेडी बिअर? अमेरिकेत भयानक दृश्य पाहून पोलिसही हादरले!

१० दिवसांत १८ ट्रेड  

हा प्रयोग अवघ्या 10 ट्रेडिंग दिवसांतच धमाल करतो. एकूण 18 ट्रेड्सपैकी 17 तो पूर्ण करतो. ChatGPT ने 13 पैकी 13 ट्रेड योग्य दिले, तर Grok ने 5 पैकी 5. 100% success rate पाहून तो स्वतःही थक्क होतो आणि म्हणतो, “हा तर चमत्कार आहे!” आता तो हा प्रयोग 6 महिने चालवण्याचा विचार करत आहे.

सोशल मीडियावर चर्चा

या पोस्टनंतर Reddit आणि ट्विटरवर उत्सुकता उसळली आहे. अनेकांनी AI चं कौतुक केलं आहे, तर काहींनी याला “बुल मार्केटमधले भाग्य” म्हणून सावधगिरीची सूचना दिली आहे.

  • एक यूजर म्हणतो, “मंडेपासून मी देखील सुरुवात करणार!”
  • दुसरा म्हणतो, “गोल्फ तर शिकलो… आता ChatGPT वापरून पैसे कमवेन.”
  • काहींनी मात्र हे “ज्ञान नव्हे, सट्टा” असंही म्हटलं आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment