पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक ‘या’ देशाला, भारताची खराब सुरुवात!

WhatsApp Group

Paris 2024 Olympics : ऑलिम्पिक सुरू झाले आहे. भारतासाठी या दिवसाची सुरुवात खराब झाली आणि प्रथम मिश्र स्पर्धेत आणि नंतर एकेरीत नेमबाजीत निराशा आली. 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतीय संघाला अंतिम फेरीतील स्थान हुकले. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अर्जुन सिंग चीमा आणि सरबज्योत सिंग हे देखील पात्रता फेरीतून बाहेर पडले. पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक चीनने जिंकले तर पहिले पदक कझाकिस्तानला मिळाले.

पॅरिसमध्ये यावेळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी झालेल्या शानदार उद्घाटन सोहळ्यानंतर आता पदकांची घोडदौड सुरू झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे पदक खाते उघडले आहे. पहिले पदक कझाकस्तानला गेले, कझाकिस्तानने 10 मीटर रायफल मिश्र संघात जर्मनीचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. कझाकिस्तानने जर्मनीविरुद्ध 17-5 असा विजय मिळवत हे पदक जिंकले.

हेही वाचा – हवामान अंदाज बघण्यासाठी नासा खरंच ‘दाते पंचांग’ वापरते?

चीनच्या नावावर पहिले सुवर्णपदक

पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिल्या सुवर्णपदकाबद्दल बोलायचे झाले, तर चीनने येथे आपले नाव कोरले आहे. या ऑलिम्पिकमध्ये चीनने 10 मीटर रायफल मिश्र संघात कोरियन जोडीचा पराभव करून आपल्या देशासाठी सुवर्णपदकाचे खाते उघडले.

भारताची निराशा

10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांना पदक फेरी गाठण्यात अपयश आले. टीम 1 ची भारतीय जोडी इलावेनिल (312.6) आणि संदीप (313.7) 626.3 गुणांसह 12 व्या स्थानावर आहे तर टीम 2 रमिता (314.5) आणि अर्जुन (314.2) 628.7 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment