डोंगराळ भागात कोसळले विमान, खासदारासह 15 जणांचा मृत्यू!

WhatsApp Group

Colombia Plane Crash : कोलंबियाच्या ईशान्य भागातील नॉर्ते दे सान्तांदर प्रांतात बुधवारी एक भीषण विमान अपघात झाला. ग्रामीण आणि डोंगराळ भागात हे छोटे प्रवासी विमान कोसळले असून, विमानातील सर्व 15 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये कोलंबियाचे खासदार दिओजेनिस क्विंतेरो यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

ही दुर्घटना राज्य मालकीच्या साटेना (Satena) या विमानसेवेच्या विमानाशी संबंधित आहे. विमान कोसळल्यानंतर कुरासिका या गावातील स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रशासनाला अपघातस्थळाची माहिती दिली. त्यानंतर तातडीने बचाव व शोध पथक घटनास्थळी पाठवण्यात आले.

कोलंबियाच्या वाहतूक मंत्रालयाने नंतर दिलेल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, “विमानाचा शोध लागल्यानंतर दुर्दैवाने हे स्पष्ट झाले की या अपघातात एकही प्रवासी किंवा कर्मचारी जिवंत नाही.”

विमानाचा नोंदणी क्रमांक HK4709 असून, ते सकाळी 11:42 वाजता (स्थानिक वेळेनुसार) कुकुता विमानतळावरून उड्डाण केले होते. हे विमान ओकान्या या डोंगरांनी वेढलेल्या नगरपालिकेकडे जात होते. ही उड्डाण साधारणतः 40 मिनिटांची असते.

उड्डाणानंतर काही मिनिटांतच संपर्क तुटला

साटेना विमानसेवेच्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यानंतर विमानाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर शोध मोहिमेनंतर विमानाचा अवशेष ग्रामीण भागात सापडला.

खासदार दिओजेनिस क्विंतेरो यांचा दुर्दैवी अंत

या अपघातात मृत्युमुखी पडलेले दिओजेनिस क्विंतेरो (वय ३६) हे कॅटाटुम्बो भागाचे लोकप्रतिनिधी होते. त्यांच्या पक्षाने दिलेल्या निवेदनात सांगितले की, “दिओजेनिस क्विंतेरो हे आपल्या प्रदेशाशी निष्ठावान असलेले, समाजसेवेसाठी झटणारे आणि सार्वजनिक जबाबदारीची खोल जाणीव असलेले नेते होते.”

या अपघातात कार्लोस साल्सेडो हे समाजसेवक आणि आगामी निवडणुकीसाठी खासदारपदाचे उमेदवार देखील होते.

राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला तीव्र शोक

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सामाजिक माध्यमांवर शोक व्यक्त करत लिहिले, “या मृत्यूंमुळे मी अत्यंत दुःखी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.”

अपघाताच्या कारणांचा तपास सुरू

या भीषण दुर्घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाने सखोल चौकशी सुरू केल्याचे जाहीर केले असून, तांत्रिक बिघाड, हवामान किंवा इतर कोणत्या कारणामुळे अपघात झाला याचा तपास केला जात आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment