₹4.62 कोटी रोख, 313 किलो चांदी, 6 किलो सोन्याची बिस्किटे! दिल्लीतील एका घरात सापडलंय घबाड!

WhatsApp Group

ED Raid Delhi : दिल्लीमध्ये प्रवर्तन निदेशालयाने (ED) केलेल्या एका मोठ्या कारवाईत तब्बल कोट्यवधींचा खजिना सापडल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ‘डंकी रूट’ सिंडिकेटविरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग चौकशीदरम्यान दिल्लीतील एका ट्रॅव्हल एजंटच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ₹4.62 कोटी रोख रक्कम, 313 किलो चांदी आणि 6 किलो सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आले आहेत. या सर्व मालमत्तेची अंदाजे किंमत ₹19.13 कोटींहून अधिक असल्याचे ED कडून सांगण्यात आले आहे.

एकाच वेळी 13 ठिकाणी छापे

जालंधर झोनल ऑफिसच्या नेतृत्वाखाली ED ने 18 डिसेंबर रोजी पंजाब, हरयाणा आणि दिल्लीतील 13 व्यावसायिक व निवासी ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. ही कारवाई फेब्रुवारी 2025 मध्ये अमेरिकेतून 330 भारतीयांच्या डिपोर्टेशन प्रकरणाशी संबंधित आहे. या सर्व प्रकरणांमध्ये बेकायदेशीररीत्या अमेरिकेत पाठवण्यासाठी ‘डंकी रूट’चा वापर केल्याचा संशय आहे.

सापडले काय?

दिल्लीतील एका प्रमुख ट्रॅव्हल एजंटच्या ठिकाणी ED ला:

  • ₹4.62 कोटी रोख रक्कम
  • 313 किलो चांदी
  • 6 किलो सोन्याची बिस्किटे

यासोबतच मोबाइल चॅट्स, डिजिटल फाइल्स, व्यवहारांचे रेकॉर्ड सापडले आहेत. या चॅट्समध्ये डंकी रूटच्या इतर सदस्यांशी तिकीट, प्रवासाचे मार्ग, पैसे व कमिशनची चर्चा स्पष्टपणे आढळून आली आहे.

हरयाणात धक्कादायक खुलासा

हरयाणामधील एका मोठ्या ‘प्लेयर’च्या ठिकाणी मिळालेल्या कागदपत्रांमधून धक्कादायक बाब समोर आली आहे. हा एजंट लोकांकडून अमेरिका पाठवण्याच्या बदल्यात त्यांच्या जमिनी किंवा घरांची कागदपत्रे गहाण ठेवत होता. यामुळे पैसे पक्के राहायचे आणि कोणी पळून जाण्याची शक्यता राहायची नाही, असा या रॅकेटचा हिशोब होता.

इतर ठिकाणांहून काय जप्त?

इतर छाप्यांमध्ये:

  • मोबाईल फोन
  • संशयास्पद कागदपत्रे
  • आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड

जप्त करण्यात आले असून, संपूर्ण नेटवर्कची साखळी जोडण्यासाठी ED कडून फॉरेन्सिक तपास सुरू आहे. ही चौकशी पंजाब व हरियाणा पोलिसांच्या FIR वर आधारित असून, त्यात ट्रॅव्हल एजंट्स, बिचौलिए आणि हवाला ऑपरेटर्सचा मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे.

अमेरिकेला पाठवून कोट्यवधींची कमाई

या टोळ्या लोकांना जीव धोक्यात घालून बेकायदेशीर मार्गांनी अमेरिका पाठवत होत्या. एका व्यक्तीकडून लाखो ते कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. ED च्या सूत्रांनुसार, या कारवाईनंतर मोठ्या अटकसत्राची शक्यता नाकारता येत नाही.

काय असतो ‘डंकी रूट’?

‘डंकी रूट’ म्हणजे बेकायदेशीर स्थलांतराचा अत्यंत धोकादायक मार्ग.
या मार्गात लोकांना:

  • दक्षिण अमेरिकेतील देश
  • तिथून मेक्सिको
  • आणि मग अमेरिकेची सीमा

असा प्रवास करायला लावला जातो. या प्रवासात अनेक वेळा मृत्यू, फसवणूक आणि मानवी तस्करीचे प्रकार घडतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment