

Jacqueline Fernandez Gifts : गिफ्ट्स कोणाला आवडत नाहीत आणि ते घेण्यास कोण नकार देईल? परंतु हे गिफ्ट्स आपल्यासाठी त्रासदायक ठरतील, याचा विचारही कोण करणार नाही. असंच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत घडलं आहे. श्रीलंकेत जन्मलेली अभिनेत्री जॅकलिनसाठी मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणूक प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या भेटवस्तू अडचणीच्या ठरल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) बुधवारी सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात जॅकलिनलाही आरोपी करण्यात आलं आहे. दिल्ली न्यायालय ३१ ऑगस्ट रोजी या आरोपपत्रावर विचार करणार आहे. जॅकलिन फर्नांडिसलाही ईडीनं अनेकदा समन्स बजावले होते. तिची अनेकदा चौकशीही झाली आहे.
आरोपी म्हणून जॅकलिनचं नाव..
ईडीनं आपल्या आरोपपत्रात जॅकलिनला आरोपी बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकरणी ईडीनं यापूर्वी आरोपपत्र आणि पुरवणी आरोपपत्रही दाखल केले होते. मात्र यामध्ये जॅकलिनचं नाव आरोपी म्हणून नव्हतं. जॅकलिननं २००९ मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. एप्रिलच्या सुरुवातीला, ईडीनं पीएमएलए अंतर्गत १५ लाख रुपयांच्या रोख रकमेसह ७.२७ कोटी रुपयांचा निधी तात्पुरता संलग्न केला होता. ईडीनं या निधीचे वर्णन ‘गुन्ह्यातून कमावलेले’ असं केलं होतं. म्हणजेच सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेले गिफ्ट्स जॅकलिनसाठी अडचणीचे ठरले.
A supplementary charge sheet was filed by the Enforcement Directorate in the Rs 200 crore extortion case against conman Sukesh Chandrashekar. The charge sheet is having the name of Bollywood actor Jacqueline Fernandez as an accused.
(File Pic) pic.twitter.com/2IKt2N2lSu
— ANI (@ANI) August 17, 2022
हेही वाचा – BREAKING..! बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अटक होणार?
ईडीनं म्हटलं आहे, की सुकेश चंद्रशेखरनं खंडणीसह गुन्हेगारी कारवायांच्या कमाईतून जॅकलिन फर्नांडिसला ५.७१ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेशनं त्याची माजी सहकारी आणि या प्रकरणातील आरोपी पिंकी इराणी हिला हे गिफ्ट देण्यास सांगितलं होतं. या भेटवस्तूंव्यतिरिक्त, चंद्रशेखरनं जॅकलिनच्या कुटुंबातील सदस्यांना १,७२,९१३ डॉलर्स (सुमारे १.३ कोटी रुपये) दिले. वेब सीरिजची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी चंद्रशेखरनं जॅकलिनच्या वतीनं एका लेखकाला १५ लाख रुपये दिल्याचं तपासात समोर आलं आहे.
हेही वाचा – IND Vs ZIM 1st ODI : मराठी खेळाडूला बाहेर ढकलत भारताचा ‘हा’ स्टार करणार डेब्यू? ‘अशी’ असू शकते Playing 11!
जॅकलिनला मिळालेले ‘हे’ गिफ्ट्स..
ईडीच्या म्हणण्यानुसार, जॅकलिननं तिच्या चौकशीदरम्यान खुलासा केला होता, की सुकेशनं तिला Gucci Chanel चे तीन डिझायनर बॅग, दोन Gucci जिमवेअर आउटफिट्स, Louis Vuitton शूज, दोन जोड्या कानातले डायमंड, एक बहु-रंगीत दगड, ५२ लाखांचा घोडा आणि दोन hermes ब्रेसलेट दिले. याशिवाय सुकेशनं जॅकलिनला मिनी कूपर कारही भेट दिली. मात्र, तिनं ती घेण्यास नकार देत ती परत केल्याचा दावा केला आहे. ईडीनं सांगितलं, कीॉ जॅकलीन गेल्या वर्षी फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत सुकेशच्या सतत संपर्कात होती.