फाल्गुनी पाठक-नेहा कक्करची नेमकी भानगड काय? कशाला भांडताहेत दोघी?

WhatsApp Group

Falguni Pathak And Neha Kakkar Fight : फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांचं नाव दोन दिवसांपासून चर्चेत असल्याचं आपण ऐकत आहात. दोन गायिकांचं काय झालंय, हा प्रश्न मनात येत असेल. पण आता फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यातील लढाई संपली आहे. इंडियन आयडॉल १३ च्या मंचावरून समोर आलेला नवीन व्हिडिओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल. नेहा आणि फाल्गुनीचं सध्याचं हे प्रकरण बघून गोंधळून गेलेते. पण सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

प्रकण काय?

एकीकडे फाल्गुगी पाठक नेहा कक्करवर ‘मैने पायल है छनकाई’चे रिमिक्स व्हर्जन गाल्यामुळे नाराजी व्यक्त करत आहे. त्यांना सत्य सांगतो. दरम्यान, आता त्याचा आणि नेहा कक्करचा एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र एन्जॉय करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इंडियन आयडॉल १३ चा आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्स हैराण झाले आहेत.

इंडियन आयडॉल १३ चा हा व्हिडिओ सोनी टीव्हीच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, शोची जज नेहा कक्कर इंडियन आयडॉल १३ च्या मंचावर फाल्गुनी पाठकचे स्वागत करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नेहा कक्कर म्हणजे, ”आजचा दिवस खूप चांगला आहे. दिग्गज फाल्गुनी मॅडम आमच्यामध्ये आल्या आहेत.”

हेही वाचा – डबल पगार आणि १० लाख रुपये..! कंपनीचं कर्मचाऱ्यांना खुलं चॅलेंज; कामासोबत करावी लागेल ‘ही’ गोष्ट!

नेहा कक्करच्या गोड परिचयानंतर, फाल्गुनी पाठकने गरबा गाणे गायले आणि त्यानंतर नेहा आणि हिमेश रेशमियासह सर्वजण दांडिया खेळतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही नेहा आणि फाल्गुनीमधील भांडण संपले आहे, असे वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात, कारण हा व्हिडिओ आत्ताचा नाही, तर या एपिसोडचे शूटिंग आधीच झाले होते. आता फक्त व्हिडिओ रिलीज झाला आहे. फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्करच्या भांडणानंतर दोघांनाही एकाच मंचावर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अनेक युजर्स दोघांच्या भांडणाला खोटे सांगत आहेत.

वास्तविक नेहा कक्करने नुकतेच फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या सुपरहिट गाण्याचे रिमिक्स व्हर्जन रिलीज केले आहे. पण नेहाने आपल्या गाण्याचे रिमिक्स केलेले फाल्गुनीला आवडले नाही. फाल्गुनी पाठकने नेहाच्या गाण्यावर नाराजी व्यक्त करत तिला खूप खडसावले. ”फाल्गुनी पाठकच्या वाईट प्रतिक्रियेनंतर नेहा कक्करनेही स्पष्ट केले, ”मला मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर हे स्थान मिळाले आहे. ”

Leave a comment