VIDEO : चाहत्यानं केलं असं काही की हृतिक रोशन भडकला..! म्हणाला, “क्या कर रहा रहा है?”

WhatsApp Group

Hrithik Roshan Angry : अभिनेता हृतिक रोशन हा अशा स्टार्सपैकी एक आहे जो नेहमीच चाहत्यांच्या नजरेत राहतो. त्याच्या लाखो चाहत्यांना त्याला जवळून भेटायचं असतं, त्याला बघायचं असतं. हृतिकही त्या स्टार्सपैकी एक आहे. हृतिक ब्रह्मास्त्र पाहण्यासाठी आला आणि तिथे त्याच्या एका चाहत्यानं त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. चाहत्यानं जबरदस्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केल्यां हृतिक रोशनला आनंद झाला नाही. ब्रह्मास्त्र पाहिल्यानंतर हृतिक आणि त्याची मुले हृहान आणि हृधन थिएटरमधून बाहेर पडत होते.

…आणि ह्रतिक भडकला!

क्लिपमध्ये हृतिक त्याच्या कारजवळ उभा आहे आणि त्याच्या मुलांना कारमध्ये बसवलं. तेव्हा एक चाहत्यानं जबरदस्तीनं हृतिकजवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृत्यानं हृतिक नाराज झाला. लवकरच, हृतिकच्या टीममधील कोणीतरी चाहत्याला हृतिकपासून दूर ढकललं. कारमध्ये जाण्यापूर्वी हृतिकनं चाहत्याला रागात विचारलं ”क्या कर रहा रहा है?”

हेही वाचा – फिल्म फ्लॉप होण्याची भीती? हृतिक रोशननं फॅनच्या पायाला लावला हात; पाहा VIDEO!

शाहरुखसोबतही असंच काहीसं घडलं

काही आठवड्यांपूर्वी शाहरुख खान मुंबई विमानतळावरून बाहेर पडत असताना अशीच एक घटना घडली होती. एका चाहत्यानं शाहरुखसोबत जबरदस्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर तोही नाराज दिसला. त्‍याच्‍यासोबत मुलगा आर्यन खान होता, आर्यननं त्या चाहत्याला दूर केलं.

हेही वाचा – गणेश विर्सजन करताना चिमुरड्यांसह ११ जणांना इलेक्ट्रिक शॉक; पनवेलमधील दुर्घटना!

हृतिकचा विक्रम वेधा

हृतिक त्याच्या आगामी विक्रम वेधा या चित्रपटात सैफ अली खानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होणार आहे. याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचा ट्रेलर या आठवड्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. जुन्या विक्रम वेधामध्ये आर माधवन एका पोलिसाच्या भूमिकेत होता, तर विजय सेतुपती एका गुंडाच्या भूमिकेत होता. राधिका आपटे नव्या विक्रम वेधामध्ये हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ती विक्रमची पत्नी आणि वेदाच्या वकिलाची भूमिका साकारत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment