Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची महिलेसोबतच ‘अश्लील’ ऑडिओ क्लिप व्हायरल!

WhatsApp Group

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांची एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर लीक झाली आहे, ज्यामध्ये ते एका महिलेसोबत अश्लील संभाषण करताना आढळले आहेत. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी पत्रकार शायद अली हैदर यांनी ही क्लिप दोन भागात प्रसिद्ध केली आहे.

व्हायरल होत असलेली एक ऑडिओ क्लिप जुनी असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी, इम्रान यांच्या महिलेसोबतच्या कथित संभाषणाचा दुसरा ऑडिओ अलीकडच्या काही दिवसांचा असल्याचे दिसते. ही ऑडिओ क्लिप पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयातील असल्याचा दावाही केला जात आहे, शिवाय ज्या महिलेसोबत ही क्लिप आहे, ती महिला त्यांच्याच पक्षाची नेता तसेच मंत्री आहे, असेही म्हटले जात आहे.

हेही वाचा – जगानं घेतली नोंद..! ‘पठाण’चा वाद सुरू असताना शाहरुख खानला मिळाला ‘मोठा’ पुरस्कार; वाचा!

इम्रान खान यांच्या पक्षाने ऑडिओला म्हटले ‘फेक’

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे म्हटले आहे. पीटीआयचे नेते डॉ. अर्सलान खालिद म्हणाले, “पीटीआय अध्यक्षांचे राजकीय विरोधक बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करण्यापलीकडे विचार करू शकत नाहीत.” व्हायरल झालेला ऑडिओ इम्रान खान यांचा आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नसले तरी संभाषणाच्या शैलीवरून ते इम्रान खान असल्याचे बोलले जात आहे.

ऑक्टोबरमध्येही इम्रान खानचा एक कथित ऑडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ते खासदारांची खरेदी-विक्री करताना झळकले होते. ज्यामध्ये ते एप्रिलमध्ये संसदेतील अविश्वास ठरावातून बाहेर फेकण्यापूर्वी स्वतःवरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न करताना दिसले. इम्रान यांची आणखी एक ऑडिओ क्लिप लीक झाल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये ते मार्च २०२२ मध्ये वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानच्या राजदूताने पाठवलेल्या एका गुप्त संदेशाविषयी बोलताना ऐकले होते, ज्यामध्ये त्यांना सत्तेतून काढून टाकण्याची योजना होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment