‘भारताचे इंजीनियर्स कामचोर, 1 कोटी पगार देऊनही काम करत नाहीत…’

WhatsApp Group

Indian Engineers : आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी आणि अमेरिकन टेक कंपनी Giga ML चे सीईओ वरुण वुम्माडी यांनी अलीकडेच एका पोस्टद्वारे भारतीय इंजीनियर्सच्या कामाच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले  आहेत. त्यांनी असा दावा केला की भारतीय इंजीनियर्सना जरी वार्षिक 1 कोटी रुपये पगार दिला जात असला तरी ते कठोर परिश्रम करण्याचे टाळतात. भारतीय इंजीनियर्सच्या या वृत्तीचा त्यांना त्रास होतो, विशेषतः जे त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या आणि मधल्या टप्प्यात आहेत.

वुम्माडी म्हणाले, ‘आमच्या भारतीय शाखेसाठी इंजीनियर्सची भरती करताना, मला एक पॅटर्न लक्षात आला. 3-8 वर्षांचा अनुभव असलेले अनेक इंजीनियर्स त्यांचा मूळ पगार 1 कोटी रुपये असला तरी 6 दिवस काम करण्यास तयार नाहीत. 1 कोटी रुपयांच्या मूळ पगारासाठी आठवड्यातून 6 दिवस, दिवसाचे 8 तास काम करणे पूर्णपणे वाजवी आहे.’ यावेळी वुम्माडी यांनी त्यांच्या कुटुंबाचे उदाहरण दिले आणि सांगितले की त्यांचे पालक सरकारी शिक्षक आहेत आणि ते आठवड्यातून 6 दिवस काम करतात.

ते पुढे म्हणाले की, भारतीय समाजात वर्क-लाइफ बॅलेंस’ यावर अधिक भर दिला जात आहे, ज्यामुळे कष्टकरी लोकांवर परिणाम होऊ शकतो. अनेक यशस्वी स्टार्टअप्सच्या यशाचे रहस्य 6-7 दिवस काम करणे हेच आहे. एलोन मस्कचे उदाहरण देत ते म्हणाले की, कठोर परिश्रमानेच उंची गाठता येते.

त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला, तर काहींनी विरोधही केला.  

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!  

Leave a comment