

Amitabh Bachchan’s 80th Birthday : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ८०वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना खास गिफ्ट मिळणार आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी तुम्ही त्यांचा गुडबाय हा चित्रपट ८० रुपयांमध्ये थिएटरमध्ये पाहू शकता. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना ही खास भेट दिली जात आहे. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा गुडबाय हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटात नीना गुप्ता देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
बालाजी मोशन पिक्चर्सने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘उद्या बिग बी ८० वर्षांचे होतील आणि या भव्य सेलिब्रेशनच्या निमित्ताने ११ ऑक्टोबर २०२२ रोजी फक्त ८० रुपयांमध्ये तुम्ही अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट तुमच्या कुटुंबासह पाहू शकता.
हेही वाचा – ‘ही’ गोष्ट चोरण्यासाठी १०८ वर्षाच्या आजीचे दोन्ही पाय कापले..!
On October 11 You can watch #GoodBye for Rs. 80 as part of the Legend's Birthday Celebration. @SrBachchan @iamRashmika pic.twitter.com/ErZ8Ld3Ede
— Abhishek Parihar (@BlogDrive) October 9, 2022
या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. रश्मिका मंदानाने गुडबाय चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. गुडबाय हा कौटुंबिक चित्रपट आहे, जो कुटुंबाचे महत्त्व दाखवतो. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. या चित्रपटात शिवीग नारंग, सुनील ग्रोव्हरसह अनेक कलाकार सहाय्यक भूमिकेत दिसले.