Google Chrome ला विसराच! ऑगस्टमध्ये येतोय ‘GPT-5’ ब्राउझर, AI जगताचा नवा राजा?

WhatsApp Group

GPT-5 vs Google Chrome : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) स्पर्धेत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन ऑगस्ट 2025 मध्ये GPT-5 नावाचे अत्याधुनिक AI मॉडेल लाँच करणार आहेत. या नव्या मॉडेलमुळे Google Chrome सारख्या टूल्सना थेट टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

GPT-5 हे आतापर्यंतचं सर्वात वेगवान, हुशार आणि अचूक मॉडेल ठरणार आहे. ‘The Verge’च्या रिपोर्टनुसार, हे मॉडेल GPT-4 पेक्षा अनेक पट अधिक क्षमतेचं असेल. OpenAI या नव्या मॉडेलसह एक AI-पावर्ड वेब ब्राउझर देखील लाँच करू शकते.

GPT-5 फ्री मिळेल का?

सॅम ऑल्टमन यांनी सूचित केलं आहे की, संपूर्ण जगाला GPT-5 चा फ्री व्हर्जन मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. याचा अर्थ OpenAI आता AI केवळ पेड युझर्सपुरता मर्यादित ठेवणार नाही.

GPT ब्राउझर देणार Google Chrome ला कडवी स्पर्धा

OpenAI लवकरच असा AI ब्राउझर सादर करू शकते, जो GPT-5 च्या क्षमतेसह स्मार्ट वेब ब्राउझिंगचा अनुभव देईल. याशिवाय ChatGPT Agent देखील युझर्सच्या संगणकावर स्वयंचलित टास्क पार पाडतोय — फाइल्स उघडणं, ईमेल पाठवणं, डेस्कटॉपवर शोध घेणं इत्यादी.

OpenAI ची रणनीती

OpenAI आता आपले AI मॉडेल्स एकामागून एक सोडणार आहे, जसं की ‘o3 R’, ‘o4-mini’ — जेणेकरून युझर्सला नवीन तंत्रज्ञानाशी हळूहळू परिचय होता येईल.

GPT-5 ची टक्कर चीनच्या DeepSeek शी

AI च्या शर्यतीत चीनच्या DeepSeek सारख्या कंपन्यांचं वर्चस्व झपाट्यानं वाढतंय. त्यामुळे OpenAI साठी GPT-5 हा एक मोठा गेमचेंजर ठरू शकतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment