

HDFC Bank Hikes Loan Rate : महागड्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लोकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. कर्जदार व्याजदर कपातीच्या भेटीची वाट पाहत आहेत, पण रिझर्व्ह बँकेने त्यांची निराशा केली. आरबीआयने रेपो दरात कपात न करून लोकांची विशेषतः कर्जधारकांची निराशा केली. आता खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे.
एचडीएफसी बँकेने आपल्या व्याजदरात बदल केला आहे. बँकेने MCLR दर 5 बेसिस पॉईंटने वाढवले आहेत. नवीन दर 7 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. यासह 3 महिन्यांचा व्याजदर 9.25 टक्क्यांवरून 9.30 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे 6 महिन्यांच्या कर्जासाठी नवा व्याजदर 9.30 टक्के, एक वर्षाच्या कालावधीसाठी 9.45 टक्के आणि दोन वर्षांसाठी 9.45 टक्के व्याजदर असेल.
बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन घेणाऱ्यांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. त्यांचा ईएमआय वाढेल. पूर्वीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल. म्हणजे एकूणच कर्ज घेणाऱ्यांवरील बोजा वाढला आहे. केवळ एचडीएफसीच नाही तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानेही गेल्या महिन्यात वेगवेगळ्या कालावधीसाठी कर्जाच्या व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. एसबीआय व्यतिरिक्त कॅनरा बँक, युको बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही आपली कर्जे महाग केली आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!