

Petrol Pump Business In India : भारतात वाहतूक आणि लॉजिस्टिक सेक्टर झपाट्याने वाढत असल्यामुळे पेट्रोल पंप व्यवसाय हा एक सर्वात फायदेशीर व्यवसायांपैकी मानला जातो. जर तुम्हीही स्वतःचा पेट्रोल पंप सुरु करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
या लेखात तुम्हाला पात्रता, जमीन, परवाने, गुंतवणूक आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर मार्गदर्शन दिले आहे.
पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी पात्रता आणि अटी:
- वय: 21 ते 55 वर्षे
- नागरिकत्व: भारतीय नागरिक / NRI (भारतात 182 दिवसाहून अधिक वास्तव)
- शिक्षण:
- सामान्य प्रवर्ग: 12वी पास
- SC/ST/OBC: 10वी पास
- शहरी भागात डीलरशिपसाठी पदवीधर असणे आवश्यक
जमिनीची अट:
- जमीन स्वतःची किंवा लीजवर चालेल
- क्षेत्रफळ: 800 ते 1200 चौ.मी.
- लोकेशन:
- रेग्युलर आउटलेट: हायवे / शहर
- ग्रामीण आउटलेट: गावांमधील मुख्य रस्त्यालगत
- ब्लॅकलिस्टेड लोकेशन चालणार नाही
किती गुंतवणूक लागते?
- ग्रामीण भाग: ₹15–₹20 लाख
- शहरी भाग: ₹30–₹35 लाख (जर जमीन स्वतःची असेल)
- गुंतवणुकीचे स्रोत: एफडी, म्युच्युअल फंड, बँक सेव्हिंग्ज, एनएससी, पोस्ट ऑफिस योजना
फी आणि परवाने:
- अर्ज फी: ₹1000 (SC/ST/OBC साठी ५०% सूट)
- लायसन्स फी:
- B/DC वर्ग: ₹18/किलोलीटर
- A/CC वर्ग: ₹48/किलोलीटर
- फिक्स फी:
- ग्रामीण: ₹5–₹10 लाख
- शहरी: ₹15–₹30 लाख
आवश्यक परवाने आणि कागदपत्र
- जमीन मालकी प्रमाणपत्र
- NOC, फायर विभाग, MCD व अन्य स्थानिक परवाने
डीलरशिप कुणाकडून मिळेल?
भारत सरकारची ऑयल मार्केटिंग कंपन्या (OMC) डीलरशिप देतात. प्रमुख कंपन्या:
- IOC (इंडियन ऑइल)
- BPCL (भारत पेट्रोलियम)
- HPCL (हिंदुस्तान पेट्रोलियम)
- रिलायन्स, एस्सार, शेल इंडिया, IGL, ONGC
कसा कराल अर्ज?
- कंपन्या डीलरशिपसाठी जाहिराती देतात – वृत्तपत्रे किंवा वेबसाईटवर
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- अनेक अर्ज आल्यास लॉटरी किंवा बिडिंगद्वारे निवड
(सूचना: हा लेख माहितीच्या उद्देशाने आहे. प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्यासाठी अधिकृत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा