VIDEO : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीच्या भावाचा दिल्लीत निर्घृण खून, आरोपी अल्पवयीन सख्खे भाऊ!

WhatsApp Group

Huma Qureshi Cousin Murdered : दिल्लीच्या हृदयात घडलेला खळबळजनक प्रकार! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीचा चुलत भाऊ आसिफ कुरैशी याचा दिल्लीच्या निजामुद्दीन भागात निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पार्किंगच्या किरकोळ वादातून हे हत्याकांड घडले. आरोप आहे की, गौतम आणि उज्ज्वल नावाचे दोन अल्पवयीन सख्खे भाऊ (वय १८ आणि १९) यांनी आसिफवर प्राणघातक हल्ला केला. हे दोघे आरोपी आसिफचे शेजारी असल्याची माहिती समोर आली आहे.

स्कूटी उभी केली, पुढे…

रात्री उशिरा घडलेली ही घटना दिल्लीच्या जंगपुरा भागातील भोगल मार्केट लेनमध्ये घडली. आसिफ कुरैशी कामावरून घरी परतत असताना, त्याच्या घरासमोर गौतम आणि उज्ज्वल यांनी आपली स्कूटी उभी केली होती. त्यावरून आसिफने स्कूटी बाजूला हटवण्याची विनंती केली. मात्र दोघांनी स्कूटी हटवण्याऐवजी आसिफसोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर दोघांनी एका धारदार वस्तूने त्याच्यावर हल्ला केला.

हल्ला इतका गंभीर होता की आसिफ जागीच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

यापूर्वीदेखील पार्किंगसंदर्भात वाद…

आसिफची पत्नी सैनाज़ कुरैशी यांनी सांगितले की, या दोघांसोबत यापूर्वीदेखील पार्किंगसंदर्भात वाद झाले होते. आरोपी हे मुद्दाम वाद घालण्याचा प्रयत्न करत होते. आसिफच्या नातेवाईक जावेद यांनी देखील हेच म्हटले की, हे हत्येचे नियोजनपूर्वक कृत्य होते.

दिल्ली पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आसपासचे CCTV फुटेज देखील ताब्यात घेतले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी यांनी ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या गाजलेल्या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. आता तिच्या कुटुंबावर ही मोठी दुःखद घटना कोसळली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि बॉलिवूड कलाकारांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment