Indian Idol 13 Winner : ऋषी सिंह बनला विनर! ‘इतक्या’ रकमेसह जिंकली कार; दुसऱ्या नंबरवर…

WhatsApp Group

Indian Idol 13 Winner : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक असलेल्या इंडियन आयडलचा 13वा सीझन ऋषी सिंहने जिंकला आहे. देबोस्मिता रॉय या मोसमातील उपविजेती ठरली. स्पर्धक ऋषी सिंह हा शोच्या सुरुवातीपासूनच सर्वांचा आवडता बनला होता.

अयोध्याच्या ऋषी सिंहने कोलकात्याच्या देबोस्मिता रॉयला पराभूत करून ही ट्रॉफी आणि 25 लाखांची बक्षीस रक्कम जिंकली आहे. रविवारी रात्री चाहत्यांसोबत ही बातमी शेअर करताना, सोनी लिव्हने ट्विटरवर लिहिले – “सब पर चलाकर अपना जादू, ऋषी सिंहने केवळ आमचेच नाही तर इंडियन आयडलची ट्रॉफीही जिंकली. इंडियन आयडल 13 चा एक अतिशय पात्र स्पर्धक. हार्दिक शुभेच्छा.”

टॉप 6 मध्ये कोण?

टॉप 6 मध्ये कोलकाताच्या बिदिप्ता चक्रवर्ती, सोनाक्षी कर आणि देबोस्मिता रॉय यांचा समावेश होता. याशिवाय जम्मू-काश्मीरचे चिराग कोतवाल आणि शिवम सिंह यांचीही नावे या यादीत होती. सीझन 13 च्या विजेत्या ऋषीला मारुती सुझुकीने एक ब्रेझा कार देखील भेट दिली.

हेही वाचा – Jogging : म्हातारपण नकोय? रोज ‘इतकी’ मिनिटं धावा, ९ वर्षांनी कमी होईल सेल्युलर वय!

काय म्हणाला ऋषी?

शोचा हा सीझन जिंकल्यानंतर ऋषी म्हणाला, “मला अजूनही विश्वास बसत नाही की मी इंडियन आयडल 13 ची ट्रॉफी जिंकली आहे. ही भावना आश्चर्यकारक आहे. जेव्हा मी या सीझनचा विजेता झालो ,तेव्हा हे माझ्यासाठी एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होते. अशा आवडत्या आणि लोकप्रिय शोचा विजेता बनणे म्हणजे हा वारसा पुढे नेण्यासारखे आहे.” ऋषीने त्याच्या सर्व चाहत्यांचे आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment