सणासुदीला रेल्वेचा मोठा निर्णय! ‘राउंड ट्रिप पॅकेज’मध्ये २०% सवलत, जाणून घ्या संपूर्ण नियम

WhatsApp Group

Indian Railways Round Trip Package Discount : भारतीय रेल्वे मंत्रालयाने सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी आणि बुकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक नवा आणि प्रयोगात्मक उपक्रम सुरू केला आहे. ‘राउंड ट्रिप पॅकेज’ नावाच्या या योजनेत परतीच्या प्रवासावर तब्बल २०% सवलत दिली जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, सणासुदीच्या हंगामात एकाच दिशेने होणारी प्रवाशांची गर्दी कमी करून दोन्ही बाजूंचा ट्रेनचा वापर समप्रमाणात व्हावा, यासाठी ही योजना लागू केली आहे. या ऑफरमुळे प्रवासी आपल्या जाण्या-येण्याच्या तिकिटांची एकत्र बुकिंग करून मोठी बचत करू शकणार आहेत.

योजनेचे नियम व अटी

  • ही योजना फक्त त्या प्रवाशांसाठी लागू असेल जे निर्धारित कालावधीत परतीचा प्रवास ठरवतील.
  • सवलत फक्त त्या वेळीच मिळेल जेव्हा जाणे आणि परतणे हे त्याच प्रवाशांसाठी, त्याच क्लासमध्ये आणि त्याच गंतव्य-जोडीवर बुक केले जाईल.
  • दोन्ही बाजूची तिकिटे कन्फर्म असणे आवश्यक आहे.
  • सवलत फक्त परतीच्या प्रवासाच्या बेस फेअरवर २०% इतकी असेल.
  • ही सुविधा सर्व क्लासमध्ये आणि सर्व गाड्यांमध्ये (स्पेशल ट्रेनसह) लागू असेल, मात्र फ्लेक्सी फेअर असलेल्या गाड्यांमध्ये (उदा. राजधानी, शताब्दी, दुरंतो) लागू होणार नाही.
  • बुक केलेल्या तिकिटांवर कोणतेही रिफंड, बदल किंवा सुधारणा करता येणार नाहीत.
  • रेल्वे पास, व्हाउचर, पीटीओ किंवा इतर सवलती या योजनेत लागू होणार नाहीत.
  • जाणे आणि परतणे तिकीट बुकिंगसाठी तोच मोड (ऑनलाईन किंवा काउंटर) वापरणे बंधनकारक आहे.

हेही वाचा – ८ इंजिन, ६८२ डबे, ५,६४८ चाके… जगातील सर्वात लांब ट्रेन पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

बुकिंग कधी सुरू होणार?

ही सवलत १४ ऑगस्ट २०२५ पासून बुक केलेल्या तिकिटांसाठी लागू असेल.

  • जाण्याचा प्रवास: १३ ऑक्टोबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सुरू होणाऱ्या गाड्यांसाठी.
  • परतीचा प्रवास: १७ नोव्हेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान सुरू होणाऱ्या गाड्यांसाठी, ‘कनेक्टिंग जर्नी फीचर’ वापरून बुकिंग करणे आवश्यक आहे.

रेल्वेच्या या नव्या योजनेमुळे सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना तिकिट बुकिंगमध्ये सुलभता मिळणार असून प्रवासाचा खर्चही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. त्यामुळे या ऑफरचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांनी वेळेत तिकिटे आरक्षित करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment