

Ravichandran Ashwin Retirement : भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटसह 287 सामने खेळले आणि 765 विकेट घेतल्या. अश्विन हा भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे फक्त अनिल कुंबळे आहे, ज्याने 953 विकेट्स घेतल्या आहेत. गाबा कसोटी संपताच अश्विनने निवृत्ती जाहीर केली. बीसीसीआयनेही त्याच्या निवृत्तीबद्दल ट्वीट केले आहे.
अश्विनच्या निवृत्तीबद्दल रोहित शर्मा म्हणाला, ”मी पर्थला आलो तेव्हा अश्विनने मला त्याच्या निवृत्तीबद्दल सांगितले होते. एखाद्या खेळाडूने निर्णय घेतला तर त्याचा आदर केला पाहिजे. अश्विन उद्या भारतात परतणार असल्याचे त्याने सांगितले.” अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 537 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 37 वेळा फाइव्ह विकेट हॉल आहेत आणि 8 वेळा मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने 156 एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत. अश्विनने टी-20 मध्ये 72 विकेट घेतल्या आहेत.
Ravichandran Ashwin announces his retirement from all forms of international cricket.
— 7Cricket (@7Cricket) December 18, 2024
Congratulations on a brilliant career 👏 pic.twitter.com/UHWAFmMwC0
एक फलंदाज म्हणून अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 3503 धावा केल्या आणि एकूण 6 कसोटी शतके झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची एकूण 8 शतके होती.
🫂💙🇮🇳
— Star Sports (@StarSportsIndia) December 18, 2024
Emotional moments from the Indian dressing room 🥹#AUSvINDOnStar #BorderGavaskarTrophy #Ashwin #ViratKohli pic.twitter.com/92a4NqNsyP
क्रिकेटमध्ये, संघ सहसा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मुख्य खेळाडूंच्या खेळण्याच्या शैलीचा आणि सामर्थ्याचा आढावा घेतात. पण, अश्विनच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे. तो सामना खेळू नये म्हणून टेनिस बॉलच्या सामन्यादरम्यान विरोधी संघाने त्याचे अपहरण केले. अश्विनने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा उल्लेख केला होता. अश्विनने सांगितले की, रॉयल एनफिल्डमधून 4-5 चाहते आणि इतर टीमचे सदस्य आले आणि त्याला उचलण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेले. हाताची बोटे कापण्याची धमकीही दिली.
Congratulation Ravichandran Ashwin Anna for the 100th Test👏
— KohliSensual (@Kohlisensual05) March 6, 2024
On the eve of this special occasion, watch his all 507 wickets in Test Cricket#Ashwin @ashwinravi99 pic.twitter.com/QUVDxhLm8P
अश्विनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा तो मध्यमगती गोलंदाजी करायचा. त्याचे बालपणीचे शालेय प्रशिक्षक सीके विजयकुमार यांनीच त्याला मध्यमगती गोलंदाज ते ऑफ-स्पिनर बनण्यास मदत केली. विजय कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अश्विन 11वीत शिकत असताना ही घटना घडली. तो नेटमध्ये मध्यमगती गोलंदाजी करत होता. गोलंदाजी करताना दमल्यावर त्याने येऊन विचारले, मी ऑफ-स्पिन करू शकतो का? विजयकुमार यांनी अश्विनच्या म्हणण्याशी सहमत असल्याचे सांगितले. त्याचा ऑफ स्पिन हळूहळू त्याची खास प्रतिभा म्हणून उदयास आली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!