

IPL 2023 RCB vs CSK Shivam Dubey 111 Meter Six : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने आपल्या स्फोटक फलंदाजीने थैमान घातले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 27 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी केली. शिवमने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 2 चौकार लगावले. यादरम्यान त्याने असा षटकार मारला की तो स्टेडियमच्या छतावर जाऊन पडला. शिवम दुबेचा हा षटकार 101 मीटर लांब होता. या मोसमात दुसऱ्यांदा शिवमने 111 मीटर लांब षटकार मारला.
या सामन्यात अजिंक्य रहाणेनंतर शिवम दुबे फलंदाजीला आला. क्रीजवर येताच शिवमने आरसीबीच्या गोलंदाजांवर निशाणा बनवण्यास सुरुवात केली. यानंतर, तो बाद होईपर्यंत त्याने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. शिवम दुबेच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळे सीएसकेने निर्धारित 20 षटकांत 226 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
हेही वाचा – टी-20 मॅच खेळणारा भारताचा पहिला क्रिकेटर कोण? 90% लोकांना माहीत नाही उत्तर!
2019: #TATAIPL debut for @RCBTweets 🏏
Now: Chief destructor against them for @ChennaiIPL 💛
Shivam Dube's attack mode was 🔛 with the bat🔥#RCBvCSK #IPLonJioCinema #IPL2023 | @IamShivamDube pic.twitter.com/jTnfAAccOL— JioCinema (@JioCinema) April 17, 2023
शतकापासून हुकला कॉनवे
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉनवेने शानदार फलंदाजी केली. ऋतुराज गायकवाडसह डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या कॉनवेने 45 चेंडूत 83 धावांची शानदार खेळी केली. आपल्या फलंदाजीत त्याने 6 षटकार आणि तब्बल 6 चौकार लगावले. शिवम दुबेसह कॉनवेने धुमश्चक्री फलंदाजी करताना आरसीबीच्या गोलंदाजांची अवस्था बिघडवली होती. 16व्या षटकात हर्षल पटेलने कॉनवेला बोल्ड केले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!