RCB vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा प्लेऑफमध्ये? 87 टक्के पावसाची शक्यता, वादळही होणार!

WhatsApp Group

IPL 2024 RCB vs CSK : आज आयपीएलमध्ये सर्वात मोठा सामना होणार आहे. आरसीबी आणि सीएसके नॉकआऊट मॅचमध्ये भिडणार आहेत. या सामन्याचा निकाल येताच प्लेऑफमधील चार संघ निश्चित होतील. कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आधीच पात्र ठरले आहेत. सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यातील सामन्यात पावसाची शक्यता आहे. आज 18 मे रोजी बंगळुरूमध्ये हवामान कसे आहे ते जाणून घेऊया.

ताज्या अहवालानुसार, आज बंगळुरूमध्ये ढगाळ वातावरण आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असल्याचे सांगितले जाते. पावसाची शक्यता बघितली तर तो जवळपास 87 टक्के आहे. म्हणजे सामन्यादरम्यान किंवा त्यापूर्वी पाऊस पडू शकतो. बंगळुरूमध्ये वादळाची शक्यता 38 टक्के दर्शविण्यात आली आहे. कोणत्याही कारणाने सामना थांबला तर आरसीबीचे मोठे नुकसान होईल.

जर सामना झाला नाही तर चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचेल कारण त्यांचे 14 सामन्यांत 15 गुण असतील तर आरसीबीचे 14 सामन्यांतून 13 गुण असतील. जर सामना खेळला गेला तर आरसीबीला किमान 18 धावांनी किंवा 11 चेंडू शिल्लक असताना जिंकावे लागेल. आरसीबी सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. कोणता संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतो हे पाहणे बाकी आहे. विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून गेल्या पाचपैकी तीन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment