

IRCTC Tatkal New Rule 2025 : भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत 15 जुलै 2025 पासून आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य केलं आहे. IRCTC वेबसाईट किंवा अॅपवरून तत्काळ तिकीट बुक करताना आता प्रवाशांना आपला आधार क्रमांक लिंक करणं आणि OTP वेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे.
नवीन कायदा काय सांगतो?
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा निर्णय प्रवाशांना पारदर्शक सेवा देण्यासाठी आणि एजंट व दलालांकडून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी घेण्यात आला आहे. यामुळे आता प्रवाशाच्या मोबाईलवर आलेल्या OTP शिवाय तिकीट बुक करता येणार नाही.
एजंट्सना मोठा धक्का
IRCTC च्या नव्या नियमांनुसार, तत्काळ बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांत एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीत, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी संधी मिळणार आहे.
हेही वाचा – समोसा, जिलेबीवर आता सिगरेटसारखी वॉर्निंग!, आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारचा मोठा निर्णय
ज्यांच्याकडे आधार नाही त्यांचं काय?
जर तुमच्याकडे आधार नसेल किंवा मोबाइल आधारशी लिंक नसेल, तर तत्काळ तिकीट बुक करणं शक्य होणार नाही. हे नियम ऑनलाइन आणि काउंटर बुकिंग दोन्हीसाठी लागू होतील.
🧾 IRCTC खाते आधारशी कसे लिंक कराल?
- IRCTC वेबसाइट ला भेट द्या
- “My Profile” > Aadhaar KYC वर क्लिक करा
- आधार क्रमांक टाका आणि मोबाईलवर आलेला OTP द्या
कोणत्या तिकीटांवर लागू?
हे नियम फक्त तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंगसाठी लागू आहेत. सामान्य आरक्षण, वेटिंग लिस्ट किंवा जनरल तिकीट बुकिंगवर सध्या लागू नाहीत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!