

IRCTC New Ticket Rule : सणांचा हंगाम सुरू झाला की, भारतीय रेल्वेच्या तिकिटांसाठी एक वेगळीच धावपळ सुरू होते. कितीही फास्ट इंटरनेट लावा, तरी IRCTC अॅप किंवा वेबसाईट हँग होते आणि बुकिंग संपतं. पण आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे – IRCTC एक नवीन नियम लागू करत आहे, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना ट्रेनचे तिकीट बुक करताना 15 मिनिटांची खास संधी मिळणार आहे.
1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणारी नवीन प्रणाली
IRCTC ने जाहीर केलं आहे की 1 ऑक्टोबर 2025 पासून, जेव्हा ट्रेनचं आरक्षण सुरू होतं, त्या क्षणापासून पहिले 15 मिनिटं फक्त सामान्य प्रवाशांसाठीच असणार आहेत.
या 15 मिनिटांमध्ये कोणताही एजंट तिकीट बुक करू शकणार नाही.
म्हणजे तुम्ही एक सामान्य IRCTC यूजर असाल, तर तुम्हाला ही गोल्डन विंडो मिळणार आहे – पण त्यासाठी एक अट पूर्ण करणं आवश्यक आहे.
हेही वाचा –रिटर्न भरायचा राहिलाय? सरकारनं दिली अंतिम संधी; पण…
तुमचं IRCTC अकाउंट ‘आधार’शी लिंक असणं गरजेचं!
ही 15 मिनिटांची खास विंडो मिळवण्यासाठी, तुमचं IRCTC प्रोफाइल Aadhaar कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. हीच प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी ‘तात्काळ तिकिट बुकिंगसाठी’ लागू केली होती, आणि आता ती सामान्य आरक्षणासाठी देखील लागू होणार आहे.
हे कोणत्या प्रकारच्या तिकिटांसाठी लागू आहे?
- स्लीपर ते फर्स्ट एसी पर्यंत सर्व रिजर्वेशनसाठी
- सामान्य तिकिट बुकिंगसाठी
- तात्काळ तिकिटासाठी वेगळ्या वेळा आहेत:
- AC क्लास – सकाळी 10:00 ते 10:30
- Non-AC क्लास – सकाळी 11:00 ते 11:30
जर आधार लिंक नसेल तर?
IRCTC ने याचा पर्यायही दिला आहे. जर तुमचं IRCTC अकाउंट आधारशी लिंक नसेल, तरी घाबरायचं कारण नाही. पहिल्या 15 मिनिटांच्या नंतर, पुढील 10 मिनिटांची विंडो आहे – यात तुम्ही आधारशिवाय तिकीट बुक करू शकता.
त्यानंतर संपूर्ण पब्लिकसाठी बुकिंग ओपन होतं.
रिझर्वेशन काउंटरवर काय नियम?
जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या काउंटरवर जाऊन तिकिट बुक करत असाल, तर ही नियमप्रणाली लागू होत नाही. तिकडे नेहमीप्रमाणे ‘पहिले या, पहिले मिळवा’ हेच लागू राहणार.
IRCTC अकाउंट आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया (फक्त 2 मिनिटं):
- www.irctc.co.in वर लॉगिन करा
- प्रोफाइल सेक्शनमध्ये ‘My Account’ किंवा ‘Profile’ निवडा
- ‘Authenticate User’ किंवा ‘Verify User’ वर क्लिक करा
- ‘Aadhaar Card’ ऑप्शन सिलेक्ट करा
- तुमचा आधार क्रमांक आणि रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका
- ‘Submit’ किंवा ‘Update’ वर क्लिक करा
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा