

IRCTC Tour Package : येत्या उन्हाळ्यात तुम्हाला भारताचे नंदनवन काश्मीरचे सौंदर्य पाहायचे असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. वास्तविक, आयआरसीटीसीने तुमच्यासाठी खास एअर पॅकेज लॉन्च केले आहे. आयआरसीटीसीने या पॅकेजला ‘Kashmir Heaven on Earth Ex Mumbai’ असे नाव दिले आहे. या पॅकेजद्वारे, IRCTC श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामच्या सुंदर मैदानी पर्यटनाची ऑफर देत आहे.
काश्मीरचे हे टूर पॅकेज ५ रात्री आणि ६ दिवसांचे आहे. हा हवाई दौरा मुंबईपासून सुरू होईल ज्यामध्ये तुम्ही मुंबईहून श्रीनगरला जाल. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामला भेट दिल्यानंतर पर्यटकांना विमानाने मुंबईत आणले जाईल. ही सहल ठराविक अंतराने चालते. या पॅकेजचा प्रवास ९, १६, १९, २३ आणि ३० एप्रिल २०२३ रोजी सुरू होईल. तुम्ही यापैकी कोणतीही तारीख निवडू शकता.
नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळणार
या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला रात्रीच्या मुक्कामासाठी डिलक्स हॉटेलची सुविधा मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला नॉन एसी वाहनाने काश्मीरमधील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. IRCTC वेबसाइट irctctourism.com वर जाऊन या टूर पॅकेजसाठी बुकिंग करता येईल.
Whether you want to witness breathtaking beauty of Gulmarg or explore the valley of Pahalgam, Do it all without any hussel with #irctc's KASHMIR HEAVEN ON EARTH package. Know more https://t.co/s2Y2JoV8Sa@AmritMahotsav @incredibleindia @tourismgoi #bharatparv23 #AzadiKiRail
— IRCTC (@IRCTCofficial) January 20, 2023
हेही वाचा – केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘मोठी’ बातमी..! सरकारनं बदलला ‘हा’ नियम; पेन्शन, ग्रॅच्युइटी जाणार!
टूर पॅकेज हायलाइट्स
- पॅकेजचे नाव- काश्मीर हेवन ऑन अर्थ एक्स मुंबई (WMA50)
- प्रस्थान तारीख – ९, १६, १९, २३ आणि ३० एप्रिल २०२३
- कव्हर केलेले गंतव्यस्थान – श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम
- दौऱ्याचा कालावधी – ५ रात्री आणि ६ दिवस
- प्रवास मोड – फ्लाइट
पॅकेजचे भाडे
पॅकेजच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आराम वर्गात ट्रिपल ऑक्यूपेंसीसाठी प्रति व्यक्ती खर्च ४२,००० रुपये आहे. डबल ऑक्यूपेंसीसाठी प्रति व्यक्ती ४३,३०० तर सिंगल ऑक्यूपेंसीसाठी प्रति व्यक्ती किंमत रु ५९८०० आहे. बेडसह ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलासाठी ३९,४०० रुपये आणि ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलासाठी ३४,४०० रुपये शुल्क आहे. याशिवाय बेडशिवाय २ ते ४ वर्षांच्या मुलासाठी २६,८०० रुपये शुल्क आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!