

IRCTC Tour Package : तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. हे भगवान विष्णूचे मंदिर आहे. तुम्ही तिरुपती बालाजीला भेट देण्याचा विचार करत असाल, तर भारतीय रेल्वेची उपकंपनी IRCTC तुमच्यासाठी एक अप्रतिम आणि परवडणारे टूर पॅकेज घेऊन आली आहे.
Tirupati Balaji Darshan EX Mumbai असे या ट्रेन पॅकेजचे नाव आहे. 3 रात्री आणि 4 दिवसांच्या या पॅकेजसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती किमान 7,290 रुपये खर्च करावे लागतील. हे पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. पर्यटकांना खाण्यापिण्याची चिंता करावी लागणार नाही. IRCTC कडून प्रवाशांसाठी नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल. पॅकेज अंतर्गत, प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि सोलापूर स्थानकांवरून बोर्डिंग/डिबोर्डिंग करू शकतील.
हेही वाचा – Gold Silver Price Today : स्वस्तात दागिने बनवण्याची संधी..! सोने-चांदी स्वस्त; वाचा आजचा रेट!
टूर पॅकेज
- पॅकेजचे नाव – Tirupati Balaji Darshan EX Mumbai (WMR171)
- फ्रीक्वेन्सी – (4 एप्रिल ते 31 मे, 2023)
- टूर कालावधी – 4 दिवस/3 रात्री
- जेवण योजना – नाश्ता आणि रात्रीचे जेवण
- क्लास – स्टॅंडर्ड (नॉन-एसी स्लीपर) आणि कम्फर्ट (थर्ड-एसी स्लीपर)
- बोर्डिंग/डिबोर्डिंग – लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि सोलापूर.
टूरचे भाडे काय?
टूर पॅकेजसाठी दर बदलतील. हे प्रवाशाने निवडलेल्या वर्गानुसार असेल. स्टँडर्ड (नॉन-एसी स्लीपर) क्लासमध्ये प्रवास केल्यास, 9,050 रुपये सिंगल शेअरिंग शुल्क आकारले जाईल. त्याच वेळी, डबल शेअरिंगमध्ये त्याची किंमत 7,390 रुपये आहे. ट्रिपल शेअरिंगमध्ये 7,290 रु. तुमच्यासोबत 5 ते 11 वर्षे वयोगटातील मूल असल्यास, बेडसह 6,500 रुपये आणि बेडशिवाय 6,250 रुपये आकारले जातील.
Join us for an experience of spiritual enlightenment and inner peace as we explore the majestic temples of South and their rich cultural and religious heritage. https://t.co/7WxD2hJodC@AmritMahotsav @incredibleindia @tourismgoi @RailMinIndia #azadikirail
— IRCTC (@IRCTCofficial) April 14, 2023
कम्फर्ट (थर्ड-एसी स्लीपर) क्लासमध्ये प्रवास केल्यास सिंगल शेअरिंगसाठी 12100 रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, डबल शेअरिंगमध्ये त्याची किंमत 10,400 रुपये आहे. ट्रिपल शेअरिंगमध्ये 10,300 रु. तुमच्यासोबत 5 ते 11 वर्षे वयोगटातील मूल असल्यास, बेडसह 9,500 रुपये आणि बेडशिवाय 9,250 रुपये आकारले जातील.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!