जेव्हा शाहरुख खाननं बॉडीगार्डच्या खांद्यावर चढून फोडली होती दहीहंडी..! पाहा VIDEO

WhatsApp Group

Shah Rukh Khan and Janmashtami : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान कोणत्याही सेलिब्रेशनच्या निमित्तानं मागे राहत नाही. आज शुक्रवारी संपूर्ण देश कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2022) साजरी करत असताना शाहरुखचा एक जुना व्हिडिओही समोर आला आहे जो खूप व्हायरल होत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात असताना, महाराष्ट्रात हा सण दहीहंडीनं साजरा केला जातो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख त्याच्या घरी दहीहंडी फोडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख आपल्या बॉ़डीगार्डच्या खांद्यावर बसून हातात नारळ घेऊन हंडी फोडत आहे.

काय आहे हा व्हिडिओ?

व्हिडिओ शेअर करताना सोशल मीडियावर एका यूजरनं लिहिलं, की ‘भारतातील धर्मनिरपेक्षतेचा चेहरा. जन्माष्टमीच्या शुभेच्छा. शाहरुखचा हा व्हिडिओ २०१९ मध्ये समोर आला होता. या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरनं लिहिले, ‘लाजवाब पठाण जी.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरनं लिहिलं, की ‘जय श्री कृष्ण.’

हेही वाचा – ज्या ठिकाणी श्रीकृष्णानं प्राण सोडले, तिथं आता काय आहे?

२०१६ मध्ये एका ट्वीटमध्ये शाहरुखनं जन्माष्टमीला सांगितलं होतं, की त्याच्या लहानपणी हा सण साजरा करण्याच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. तो म्हणाला, ”लहानपणी जन्माष्टमी साजरी करण्याच्या छान आठवणी आहेत. मी आणि माझे मित्र भगवान कृष्णाच्या जन्माविषयी एक संपूर्ण झांकी तयार करायचो. जन्माष्टमीच्या शुभेच्छा.”

शाहरुख आणि जन्माष्टमी..

२०१८ मध्ये देखील शाहरुखनं जन्माष्टमीला दहीहंडी फोडताना त्याचा धाकटा मुलगा अबराम खान याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. शाहरुख शेवटचा २०१८ मध्ये ‘झिरो’ या चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर दिसला होता. तेव्हापासून शाहरुख चित्रपटगृहांपासून दूर राहिला. पण २०२२ मध्ये तो आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये स्पेशल अपिअरन्स करताना दिसला आहे. आर माधवनच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्टमध्ये शाहरुख एका विशेष भूमिकेत दिसला.

११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात शाहरुखचा कॅमिओ पाहून लोकांना आश्चर्य वाटले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात शाहरुखचीही खास भूमिका असून तो वानर अस्त्राच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.

हेही वाचा – भारीच! सुधा मूर्तींच्या जावयानं इंग्लंडमध्ये साजरी केली जन्माष्टमी; होऊ शकतात ब्रिटनचे पंतप्रधान!

शाहरुख २५ जानेवारी २०२३ रोजी नायकाच्या रुपात परतणार आहे. त्याचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यानंतर या वर्षी शाहरुखचे आणखी दोन मोठे चित्रपट येणार आहेत. दिग्दर्शक अॅटलीच्या ‘जवान’मध्ये नयनतारा शाहरुखच्या सोबत दिसणार आहे, तर राजुमार हिरानीच्या ‘डंकी’मध्ये तो तापसी पन्नूसोबत दिसणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment