

मुंबई : विज्ञानामुळं किती गोष्टी सोप्या झाल्या आहेत, याचा अनुभव आपण रोज घेत आहोत. काहीना-काही नवेनवे प्रयोग, शोध याची माहिती माध्यमांच्या रुपानं आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आता अशीच एक भन्नाट गोष्ट आपल्यासमोर आली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण लोक दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी ट्रेनचा वापर करणार आहेत. भविष्यात अशी गोष्ट होणार आहे, असं एका पोस्टच्या माध्यमातून समोर आलं. यात कुशलतेची जोपासना करणाऱ्या जपान देशानं पुढाकार घेतला आहे. चंद्र आणि मंगळावर पृथ्वीसारखं राहण्यायोग्य वातावरण जपान तयार करणार आहे. पृथ्वी, चंद्र आणि मंगळ यांना जोडण्यासाठी इंटर-प्लॅनेटरी ट्रेन्सही सुरू होणार आहेत. हे संशयी वाटत असलं तरी ते खरं आहे. या प्रकल्पासाठी जपानमधील क्योटो विद्यापीठातील संशोधकांनी काजिमा कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत सहकार्य केलं आहे.
टीमनं शून्य आणि कमी गुरुत्वाकर्षण वातावरणात मानवी मस्क्यूकोस्केलेटल प्रणाली कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी पृथ्वीसारख्या वैशिष्ट्यासह ‘ग्लास’ निवासस्थानाची रचना विकसित करण्याची योजना जाहीर केली. ग्लासमध्ये पृथ्वीसारखं वातावरण आणि गुरुत्वाकर्षण शक्ती देखील असतील. त्यामुळं अंतराळात राहणं सोपं होईल. या योजनेंतर्गत, ग्लासच्या आणि आंतर-ग्रहांच्या गाड्यांचं प्रोटोटाइप करण्यासाठी सुमारे ३० वर्षे लागतील.
चंद्र आणि मंगळावरही असणार पृथ्वीसारख्या सुविधा!
क्योटो युनिव्हर्सिटी आणि काजिमा कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी मिळून अवकाशात राहण्यायोग्य रचना तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या शंकूच्या आकाराच्या रचनेचं नाव ‘ग्लास’ आहे. ग्लासच्या आत कृत्रिम गुरुत्वाकर्षण, वाहतूक व्यवस्था, वनस्पती आणि पाणीही उपलब्ध असेल. पृथ्वीवरील सर्व सुविधा अवकाशात उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. या संरचनेला चंद्रावरील ‘लुनाग्लास’ आणि मंगळावर ‘मार्सग्लास’ असं नाव असेल.
#Japan is making grand plans of creating interplanetary #trains and champagne flute-like glass habitats in its bid to send and host humans on the #Moon and #Mars!
Read: https://t.co/MjtOWrVdEH
📸: Youtube SC/Kajima Corp.
Thread. 👇 pic.twitter.com/dokxp4jZwV
— The Weather Channel India (@weatherindia) July 15, 2022
हा एक उलटा शंकू आहे, जो पृथ्वीच्या वास्तविक गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाची नक्कल करून आणि पृथ्वीसारखे गुरुत्वाकर्षण निर्माण करून केंद्रापसारक पूल तयार करण्यासाठी फिरेल. या ग्लासची उंची १३०० फूट आणि त्रिज्या ३२८ फूट असणार आहे. हा प्रयोग सुरू होण्यासाठी सुमारे १०० वर्षे लागतील.
आता चंद्र आणि मंगळावर जाणं सोपं होणार!
ही टीम इंटरप्लॅनेटरी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम तयार करण्यावरही काम करेल. ज्याला ‘HexTrack’ असं संबोधलं जाईल. हे वाहन लांबचा प्रवास करताना पृथ्वीच्या पृष्ठभागाप्रमाणं गुरुत्वाकर्षण निर्माण करेल. कमी गुरुत्वाकर्षणात प्रवास करताना मानवाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागते. गाड्यांमध्ये षटकोनी आकाराचे ‘हेक्सा कॅप्सूल’ नावाचं कॅप्सूल आणि मध्यभागी एक हलणारं उपकरण देखील असेल.
The #trains will also possess 'Hexacapsules', which are essentially hexagon-shaped capsules with a moving device in the middle. pic.twitter.com/TMzJ9AawfV
— The Weather Channel India (@weatherindia) July 15, 2022
स्टेशनची नावं…
दोन प्रकारचे कॅप्सूल तयार केले जातील, एक पृथ्वीवरून चंद्रावर जाण्यासाठी आणि दुसरं पृथ्वीवरून मंगळावर जाण्यासाठी. चंद्रा साठीच्या कॅप्सूलची त्रिज्या १५ मीट, तर मंगळावर जाणाऱ्या कॅप्सूलची त्रिज्या ३० मीटर असेल. हे कॅप्सूल प्रवासादरम्यान 1G गुरुत्वाकर्षण राखेल. चंद्रावरील स्टेशन गेटवे सॅटेलाइटचा वापर करेल आणि ते चंद्र स्टेशन म्हणून ओळखलं जाईल, तर मंगळावरील रेल्वे स्टेशन मंगळ स्टेशन म्हणून ओळखलं जाईल. हे स्टेशन मंगळाच्या फोबोस या उपग्रहावर असेल. ह्युमन स्पेस सायन्स सेंटरच्या मते, पृथ्वी स्टेशनला टेरा स्टेशन म्हटलं जाईल.