वैष्णोदेवी मंदिराजवळ दारू पिणारा ओरी पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल

WhatsApp Group

FIR Against Orry : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया फेम ओरी (ओरहान अवत्रामणी) आणि इतर ७ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्याच्यावर वैष्णोदेवी मंदिराजवळ दारू पिल्याचा आरोप आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, कटरा येथील एका हॉटेलमध्ये दारू पिल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कटरा हे एक धार्मिक स्थळ आहे जिथे मद्यपान आणि मांसाहार पूर्णपणे निषिद्ध आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

एका वृत्तानुसार, या प्रकरणात रशियन नागरिक अनास्तासिया अर्समस्किनाचेही नाव आहे, जी ओरी आणि त्याच्या मित्रांसह कटरा येथे गेली होती. कटरा पोलीस ठाण्यात एफआयआर (क्रमांक ७२/२५) नोंदवण्यात आला आहे. ओरी व्यतिरिक्त, आरोपींमध्ये दर्शन सिंग, पार्थ रैना, हृतिक सिंग, राशी दत्ता, रक्षित भोगल आणि शगुन कोहली यांचा समावेश आहे. त्यांच्यावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

ओरी म्हणून प्रसिद्ध असलेला ओरहान अवत्रामणी हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे आणि त्याला लिवूड सेलिब्रिटींच्या जवळचा मानले जाते. तो अनेकदा अनन्या पांडे, जान्हवी कपूर, उर्वशी रौतेला, भूमी पेडणेकर यांसारख्या स्टार्ससोबत पार्टी करताना दिसतो. मुंबईतील रहिवासी असलेल्या ओरीचे सोशल मीडियावर चांगले चाहते आहेत.

हेही वाचा – ९ महिने अंतराळात फसलेल्या सुनीता विल्यम्सना जास्त पगार मिळणार?

त्याचबरोबर, प्रकरणाचे गांभीर्य पाहून, धार्मिक स्थळांचे पावित्र्य भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, असे रियासी पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पोलीस तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्याचे आवाहन प्रशासनाने लोकांना केले आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment