

मुंबई : बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनला नवे पंतप्रधान मिळणार आहेत. या पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे दोन टप्प्यातील मतदानानंतर आघाडीवर होते, तर व्यापार धोरण मंत्री पेनी मॉर्डंट दुसऱ्या क्रमांकावर होते. त्याच वेळी, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात महिला मंत्री मॉर्डोन्ट यांना आघाडीवर म्हणून उद्धृत केलं गेलं आहे. ऋषी सुनक यांच्या पंतप्रधान होण्याच्या मार्गातील मॉर्डोन्ट सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे.
पहिल्या फेरीत ऋषी सुनक हे आघाडीवर होते. त्यांना ८८ मतं मिळाली. पेनी मॉर्डोन्ट ६७ मतांसह दुसऱ्या स्थानावर होत्या. दुसऱ्या फेरीच्या मतदानात ऋषी सुनक हे १०१ मतांनी आघाडीवर आहेत. त्याच वेळी, मॉर्डोन्ट ८३ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूकेमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाचं बहुमत आहे. पक्षातच पंतप्रधान निवडीची प्रक्रिया सुरूय. या अंतर्गत, नामांकन, निर्मूलन आणि अंतिम निवडीच्या फेऱ्या आहेत. एलिमिनेशन फेरी सध्या सुरू आहे. शेवटचे दोन उमेदवार राहेपर्यंत ही फेरी सुरू राहील. त्यानंतर अंतिम निवड फेरी होईल. त्यात पक्षाचे खासदार व इतर सदस्य मतदान करतात. विजयी उमेदवाराची पंतप्रधानपदासाठी निवड केली जाईल. एलिमिनेशन राऊंड आणि सिलेक्शन राऊंडमधील हा फरक ऋषी सुनक यांच्या दाव्यावर परिणाम करू शकतो. म्हणूनच सर्वेक्षणाचे निकाल खूप महत्त्वाचे आहेत.
Former British Finance Minister Rishi Sunak won the most votes in the first round of voting to succeed Boris Johnson as leader of the Conservative Party and UK Prime Minister, as two candidates were eliminated: Reuters
(File photo) pic.twitter.com/xnmpASMEQn
— ANI (@ANI) July 13, 2022
राजकीय प्रवास..
४२ वर्षीय ऋषी सुनक हे २०१५ पासून रिचमंड (यॉर्क्स) येथून खासदार आहेत. २०१५ ते २०१७ पर्यंत त्यांनी पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहार या निवड समितीचे सदस्य म्हणून काम केलं आहे. जानेवारी २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत ते संसदीय उपसचिव होते. जुलै २०१९ मध्ये, त्यांची बोरिस जॉन्सन सरकारमध्ये ट्रेझरीचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. २५ जुलै २०१९ रोजी ते प्रिव्ही कौन्सिलचे सदस्य झाले. मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचा एक भाग म्हणून फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांची कुलपती म्हणून पदोन्नती झाली. कोरोना महामारीच्या काळात सुनक यांनी मार्च २०२० मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला. बोरिस जॉन्सन यांच्या पंतप्रधानपदाच्या विरोधात अलीकडेच राजीनामा देणारे ते पहिले मंत्री होते.
नारायण मूर्तींचे जावई आहेत सुनक!
सुनक यांचा जन्म साऊथम्प्टन येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत काम करत होते. त्याच वेळी सुनक यांची आई फार्मसी चालवायची. ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा पंजाबशी संबंधित होते पण ते पूर्व आफ्रिकेत गेले होते. १९६०मध्ये ते र्व आफ्रिकेतून ब्रिटनला गेले. ऋषी सुनक यांचे प्रारंभिक शिक्षण विंचेस्टर महाविद्यालयात झाले, त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. सुनक यांनी एमबीए पदवी मिळवली आणि त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर प्रसिद्ध फुल ब्राइट स्कॉलरशिपही जिंकली. यानंतर सुनक यांनी गोल्डमन सॅक्ससह विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक बँकर म्हणून काम केलं. २००९ मध्ये ऋषी सुनक यांनी प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि टेक कंपनी इन्फोसिसचे संस्थापक सदस्य नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी लग्न केले.