थायलंडमध्ये पाळणाघरात रक्तपात..! माजी पोलिसानं ३४ जणांना संपवलं, २३ मुलांचा समावेश!

WhatsApp Group

Mass Shooting In Thailand : थायलंडमधील नॉन्ग बुआ लाम्फू प्रांतातील नाखोन रत्चासिमा शहरात एका व्यक्तीने ३४ लोकांची हत्या केली. ही घटना ६ ऑक्टोबरची आहे आणि हा हल्ला मुलांची काळजी घेत असलेल्या केअर सेंटरमध्ये (पाळणाघर) झाला. या घटनेनंतर हल्लेखोर त्याच्या घरी पोहोचला आणि त्याने तिथे पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये लहान मुले आणि प्रौढ दोघेही होते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार या घटनेत २३ मुलांचा मृत्यू झाला आहे. या मुलांचे वय १-४ वर्षे होते.

हल्ला करणारा बंदूकधारी माजी पोलीस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीएम प्रयुत चान ओचा यांनीही सर्व यंत्रणांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हल्ल्यामागील हेतू कळू शकलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारासोबतच आरोपीने मुलांवर चाकूने हल्लाही केला. हल्लेखोर पूर्वी थायलंड पोलिसात अधिकारी होता. मद्यधुंद अवस्थेत आणि कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. या घटनेनंतर तो अधिक प्रमाणात मद्यप्राशन करू लागला. तो अनेकदा दारूच्या नशेत सापडला होता.

हेही वाचा – भारतात नोरू चक्रीवादळामुळं प्रॉब्लेम..! महाराष्ट्रासह २० राज्यांना येलो अलर्ट

हल्लेखोराने ८ महिन्यांच्या गर्भवती शिक्षिकेवरही दयामाया दाखवली नाही. अंदाधुंद गोळीबार करताना त्याने त्या महिला शिक्षिकेचीही हत्या केली. याशिवाय हल्लेखोराने डे-केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या ४ ते ५ कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य केले. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, थायलंडमध्ये मोठ्या संख्येने लोक बंदुका खरेदी करतात. चिंतेची बाब म्हणजे शस्त्रखरेदीशी संबंधित अधिकृत आकडेवारीत बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची संख्या समाविष्ट नाही. त्याच वेळी, थायलंडच्या शेजारील देशांमध्ये बंदुका खरेदीचा दर तुलनेने कमी आहे. त्यामुळे थायलंडचे या देशांशी पटत नाही, असे म्हटले जाते. अहवालानुसार, या देशांच्या सीमेवरून अनेक बेकायदेशीर शस्त्रे थायलंडमध्ये नेली जातात.

सामान्य लोकांकडे शस्त्रे असूनही, थायलंडमध्ये सामूहिक गोळीबाराच्या घटना दुर्मिळ आहेत. मात्र, दोन वर्षांपूर्वी एका जवानाने रागाच्या भरात २९ जणांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ५७ा जण जखमी झाले होते. आरोपीला प्रॉपर्टी डीलचा राग आल्याचे सांगण्यात आले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment