नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारची शेतकऱ्यांना ‘खास’ भेट!

WhatsApp Group

Modi Govt Extends DAP Fertiliser Subsidy : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारने पीक विमा योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा फायदा 4 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यासोबतच सरकारने डीएपी खताच्या किमतीही कमी केल्या आहेत.

पीक विमा योजनेची मुदतवाढ

सरकारने पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यात आणखी 4 कोटी शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या वेळी आर्थिक मदत मिळू शकेल. सरकारने डीएपी खतावर 3,850 कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना 50 किलोची डीएपी बॅग 1,350 रुपयांना मिळत राहील. आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपीचे भाव वाढले असतानाही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – आता कोणत्याही बँकेतून काढू शकता पेन्शनचे पैसे, नवीन वर्षात EPFO चे नवीन नियम!

सरकारने शेतकऱ्यांसाठी एकूण 69,515 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या वाढीचा बोजा शेतकऱ्यांवर पडू नये, यासाठी सरकारने वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment