Mumbai Andheri Milk Adulteration : मुंबईतील अंधेरी वेस्ट परिसरातील कापसवाडी येथे दूध भेसळीचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. दुधात आरोग्याला घातक रसायनं मिसळून ते दुप्पट प्रमाणात विक्रीस ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.
दूध भेसळीमध्ये केवळ पाणीच नव्हे तर डिटर्जंट पावडर, युरिया, साबणाचे द्रावण, रिफाइंड तेल आणि सिंथेटिक रसायनं मिसळली जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका लिटर दुधाचे प्रमाण वाढवून ते दोन लिटरपर्यंत नेले जात असल्याचा आरोप आहे. हेच दूध घराघरात पोहोचतं… मुलांच्या ग्लासात जातं… आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचतं.
This image is not just disturbing — it is terrifying.
— Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) December 27, 2025
It exposes how some people are openly playing with human lives for a few filthy rupees. In Kapaswadi, Andheri West (Mumbai), a milk adulteration racket is turning daily nourishment into silent poison.
To fake milk, they are… pic.twitter.com/qP8fCksoe6
हेही वाचा – छातीत तीव्र वेदना… तरीही 8 तास ‘वेटिंग’! भारतीय व्यक्तीचा कॅनडात मृत्यू, कुटुंब उद्ध्वस्त
ही बाब केवळ भेसळ नाही — तर मानवी जीवाशी खेळण्यासारखी क्रूरता असल्याची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. थोड्याफार पैशांसाठी नागरिकांच्या आरोग्याशी असा उघड उघड जुगार खेळला जात असल्याने समाजात संताप पसरला आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा रसायनांचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो —
• पोटदुखी व उलट्या
• मूत्रपिंड व यकृतावर दुष्परिणाम
• त्वचेचे आजार
• लहान मुलांमध्ये वाढीस अडथळा
• दीर्घकालीन आरोग्य समस्या
आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच, नागरिकांनी दूध घेताना विश्वासार्ह डेअरी आणि ब्रॅण्ड निवडण्याची सूचना तज्ञांकडून करण्यात येत आहे.
ही घटना आपल्याला गंभीर प्रश्न विचारते, थोड्याशा पैशांसाठी मानवी जीवाची किंमत इतकी कमी झाली आहे का?
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा