वर्षात फक्त १ दिवस उघडणारं मंदिर; नागपंचमीला लाखोंचा जनसागर, दर्शनाने दूर होतो कालसर्प दोष!

WhatsApp Group

Nagchandreshwar Temple : मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील ‘नागचंद्रेश्वर मंदिर’ दरवर्षी फक्त नागपंचमीच्या दिवशीच उघडते, आणि या खास प्रसंगी लाखो भाविक उज्जैनमध्ये दर्शनासाठी गर्दी करतात. या वर्षीही रात्री १२ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि पहाटेपर्यंत मंदिराबाहेर किलोमीटरभर लांब रांगा लागल्या.

८ लाखांहून अधिक भक्तांनी यावर्षी दर्शन घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली. महा निर्वाणी आखाड्याच्या साधू-संतांनी विशेष पूजा करून दूध व जलाभिषेक केला. हे मंदिर बाबा महाकालेश्वर मंदिराच्या उंच मजल्यावर वसलेलं असून, वर्षभर बंद असतं.

मान्यता काय आहे?

श्रद्धेनुसार, जो कोणी नागचंद्रेश्वराच्या चरणी सच्च्या भावाने प्रार्थना करतो, त्याच्या जीवनातील त्रास, संकटं आणि विशेषतः कालसर्प दोष दूर होतो. या मंदिरात भगवान शिव संपूर्ण परिवारासह विराजमान आहेत – पार्वती, गणपती, कार्तिकेय, नंदी, सिंह, सूर्य, चंद्र आणि त्रिशूल. हा दृश्य अत्यंत दुर्मीळ आणि भक्तांना भावविवश करणारा असतो.

हेही वाचा – आज नागपंचमीचा जबरदस्त शुभ योग! २०२५ मध्ये असा योग पुन्हा मिळणार नाही!

रात्री २ वाजताही दर्शनासाठी गर्दी

उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून आलेले भाविक रात्री उशिरापर्यंत रांगेत उभे होते. “पहिल्यांदाच आलो आणि आत्मशांती अनुभवली”, असं अनेकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं.

उज्जैनच्या रस्त्यांवर फक्त भक्त आणि शिवभजनांचा गजर दिसत होता. मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment