

मुंबई : साऊथ इंडस्ट्रीत सुपरस्टार असलेल्या सूर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. आज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ची घोषणा करण्यात आली आणि दरम्यान, ‘सूरारई पोटरू’ या चित्रपटासाठी सूर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सूर्या शिवकुमारला टॉलिवूडचा सुपरस्टार म्हटलं जातं. तो आपल्या जबरदस्त आणि खिळवून टाकणाऱ्या अभिनयानं प्रत्येक चित्रपटात खळबळ उडवून देतो. ‘जय भीम’ हा त्याचा अलीकडचा गाजलेला चित्रपट. सत्य घटनेवर आधारित असा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर सूर्यानं कमल हसनच्या ‘विक्रम’मध्ये रोलेक्सची भूमिका साकारली. या चित्रपटातून त्यानं बरीच प्रशंसा मिळवली. लोकेश कनागराजच्या या चित्रपटात कमल हसन, विजय सेतुपती आणि फहद फासिल सारख्या दमदार कलाकारांनी उत्तम अभिनय दाखवला आहे. या चित्रपटातील सुर्याच्या पाच मिनिटांच्या व्यक्तिरेखेनं त्याच्या चाहत्यांना वेड लावलं. आता प्रेक्षकांच्या नजरा सुर्याच्या पुढच्या चित्रपटाकडं लागल्या आहेत.
सूर्याला आज भलेही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असेल, पण एक काळ असा होता की या इंडस्ट्रीत ठसा उमटवण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. चित्रपटसृष्टीशी निगडीत असूनही त्यानं खूप संघर्ष केला आहे. सुर्या हा तमिळ अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा आहे पण त्यानं स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत ठसा उमटवला.
68th National Film Awards: Ajay Devgn, Suriya share Best Actor Award
Read @ANI Story | https://t.co/uHB72CXyT5#68thNationalFilmAwards #AjayDevgn #Suriya #BestActorAward pic.twitter.com/BsCyQ3YDLJ
— ANI Digital (@ani_digital) July 22, 2022
He wasn't in a good form then
Everyone thought he's out from the race
Being a big star he still decided to release his film in OTTAnd today he won the Prestigious NATIONAL AWARD
Ladies and Gentlemen that's @Suriya_offl for you 👏 #SooraraiPottru #Suriya #AakaasamNeeHaddhuRa pic.twitter.com/FTlfxK6V2s
— Thyview (@Thyview) July 22, 2022
२०व्या वर्षीच ऑफर, पण..!
सूर्याला वयाच्या २०व्या वर्षी चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. १९९५ मध्ये त्याला ‘असाई’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर आली होती, परंतु तेव्हा त्याला चित्रपटांमध्ये रस नव्हता, त्यामुळं त्यानं ही ऑफर नाकारली. फिल्मी दुनियेत विशेष रस नसल्यामुळं त्यानं कापडाच्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली. आपले वडील अभिनेते असले तरी सू्र्यानं तिथल्या लोकांपासून आपली ओळख लपवून ठेवली होती. सुमारे आठ महिने त्यानं कापड कारखान्यात काम केलं आणि या कारखान्यातील कामाच्या बदल्यात त्याला दरमहा एक हजार रुपये मिळायचे.
68th #NationalFilmAwards
🎞️#SooraraiPottru directed by Sudha Kongara wins the best Feature film award
🎞️Award for the best film providing wholesome entertainment goes to Tanhaji: The Unsung Warrior, directed by Om Raut pic.twitter.com/d1aZbdn3nm
— PIB India (@PIB_India) July 22, 2022
१९९७ मध्ये दिग्दर्शक वसंत यांच्या ‘नेरुक्कू नेर’ या चित्रपटानं सूर्याशी संपर्क साधला होता. या चित्रपटाचे निर्माते मणिरत्नम होते. मणिरत्नममुळं तो या चित्रपटासाठी नकार देऊ शकला नाही आणि त्यानं साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केलं. पदार्पणानंतर सूर्याला या इंडस्ट्रीचं महत्त्व कळलं. त्यानंतर साऊथच्या चित्रपटांमध्ये आपले नाव कमावण्यासाठी त्यानं खूप मेहनत केली आणि खूप यश मिळवलं.
एका मुलाखतीत सूर्यानं सांगितले होतं, की ”सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळं, अॅक्शनमुळं आणि नृत्यामुळं मला चित्रपटांमध्ये सीन करताना खूप त्रास व्हायचा. त्या काळात माझे गुरू रघुवरन यांनी मदत केली आणि माझ्या वडिलांपासून कशी वेगळी ओळख निर्माण करायची हे शिकवलं.”
‘सूरारई पोटरू’ म्हणजे काय?
सूर्याला ज्या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला तो ‘सूरारई पोटरू’ हा चित्रपट खूप गाजला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. ‘सूरारई पोटरू’ हा तमिळ शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘वीरांचा जयजयकार’ असा होतो. या चित्रपटाची कथा एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांच्यावर आधारित आहे. गोपीनाथ यांनी देशातील सर्वसामान्य जनतेचं विमानातून प्रवास करण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं.