

PAK vs BAN World Cup 2023 : भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी सुमार राहिली आहे. त्यांनी 6 पैकी 4 सामने गमावले आहेत. अशा स्थितीत बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. पाकिस्तानचा संघ आज आपल्या सातव्या सामन्यात बांगलादेशशी भिडत आहे. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर रंगणाऱ्या या सामन्यात बांगलादेशचा कप्तान शाकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर फलंदाज इमाम उल हक आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जागी फखर जमानला संधी मिळाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा फखर हा पाकिस्तानचा एकमेव फलंदाज आहे. इमाम हा पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम उल हकचा पुतण्या आहे. हितसंबंधांच्या संघर्षामुळे इंझमामने कालच चीफ सिलेक्टर पदाचा राजीनामा दिला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून उपकर्णधार शादाब खानलाही वगळण्यात आले आहे. आगा सलमानलाही संधी मिळाली आहे.

हेही वाचा – Gold Silver Price Today In Marathi : सोन्या-चांदीच्या किमतीत बदल!
दोन्ही संघांची Playing 11
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, उसामा मीर, मोहम्मद वसीम, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.
बांगलादेश – लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, तौहिद ह्रदोय, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!