Asim Munir Nuclear Threat : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर (Asim Munir) यांनी थेट अमेरिकेच्या भूमीवरून भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. फ्लोरिडा (Florida) येथील टँपा (Tampa) शहरात पाकिस्तानी उद्योगपती आणि मानद वाणिज्य दूत अदनान असद यांनी आयोजित केलेल्या ब्लॅक-टाय डिनरमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “जर भारतासोबतच्या भविष्यातील युद्धात पाकिस्तानच्या अस्तित्वावर संकट आले, तर आम्ही या संपूर्ण प्रदेशाला अणुयुद्धात ढकलू. आम्ही एक अण्वस्त्रसज्ज राष्ट्र आहोत आणि जर आम्ही बुडत असू, तर अर्धी दुनिया घेऊनच बुडू.”
अमेरिकेतून दिलेली पहिली थेट अणु-धमकी
इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, एखाद्या देशाच्या लष्करप्रमुखाने अमेरिकेच्या भूमीवरून थेट तिसऱ्या देशाला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. ‘दि प्रिंट’च्या सूत्रांच्या माहितीनुसार, आसिम मुनीर यांनी भारतावर सिंधु नदीच्या पाण्यावर नियंत्रणाच्या मुद्द्यावरूनही हल्लाबोल केला.
हेही वाचा – सणासुदीला रेल्वेचा मोठा निर्णय! ‘राउंड ट्रिप पॅकेज’मध्ये २०% सवलत, जाणून घ्या संपूर्ण नियम
त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही भारताचे धरणे बांधून पूर्ण होण्याची वाट पाहू. आणि जेव्हा ते घडेल, तेव्हा आम्ही 10 क्षेपणास्त्रांनी त्याचा नाश करू. सिंधु नदी भारतीयांची वैयक्तिक मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही.”
भारत आणि पाकिस्तानची वाहनांशी तुलना
मुनीर यांनी भारत आणि पाकिस्तानची तुलना करताना म्हटले, “भारत हा महामार्गावर धावणाऱ्या मर्सिडीजसारखा आहे आणि पाकिस्तान हा खडी-विटांनी भरलेला डंप ट्रक आहे. जेव्हा ट्रक कारला धडकतो, तेव्हा नुकसान कोणाचे जास्त होईल, ते स्वतः विचार करा.”
अमेरिकी दौऱ्यातील उद्दिष्ट
फील्ड मार्शल आसिम मुनीर हे अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) चे विद्यमान कमांडर जनरल मायकेल कुरिल्ला यांच्या निवृत्ती समारंभाला उपस्थित राहण्यासाठी फ्लोरिडा येथे आले होते. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकन राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत तसेच अमेरिकेत स्थायिक पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांशीही भेट घेतली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भारतासोबतच्या चार दिवसांच्या संघर्षानंतर गेल्या दोन महिन्यांत मुनीर यांचा हा दुसरा अमेरिकन दौरा आहे.
जून महिन्यात त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये तेल करारासह विविध विषयांवर सहकार्याचे संकेत मिळाले होते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!