

Patanjali Foods Shares Freeze : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने शेअर बाजाराच्या नियमांचे पालन न केल्यामुळे बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सचे सुमारे २९.२५ कोटी शेअर्स गोठवले आहेत. आजपासून या शेअर्समध्ये कोणताही व्यवहार होणार नाही. एक्सचेंजने गोठवलेले शेअर्स कंपनीच्या प्रवर्तक गटाचे आहेत. यामध्ये पतंजली आयुर्वेदच्या स्टॉकचाही समावेश आहे.
सेबीच्या नियमानुसार बाजारात सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही कंपनीच्या स्टॉकपैकी २५ टक्के शेअर जनतेकडे असायला हवा. डिसेंबर २०२२ च्या अखेरीस, पतंजली फूड्सने या नियमांचे पालन केले नाही आणि त्यांच्या समभागांमध्ये सार्वजनिक होल्डिंग केवळ १९.१८ टक्के राहिली. या नियमांचे उल्लंघन करून, कंपनीने आपल्या प्रवर्तकांकडे बहुसंख्य हिस्सेदारी राखून ठेवली आहे आणि यामुळेच केवळ दोन स्टॉक एक्स्चेंजने प्रवर्तकांचे शेअर्स गोठवले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून कंपनीच्या २९ कोटींहून अधिक शेअर्सचे व्यवहार ठप्प झाले.
एक्सचेंजच्या या कारवाईवर कंपनीने आपली भूमिका मांडली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्टॉक एक्सचेंजच्या निर्णयाचा कंपनीच्या आर्थिक प्रोफाइलवर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीने म्हटले आहे की प्रवर्तकांचे शेअर्स ८ एप्रिलपर्यंत लॉक इन आहेत. त्यामुळे त्याचा काहीही परिणाम होणार नाही. तथापि, आम्ही सार्वजनिक शेअरहोल्डिंगच्या नियमांचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत आणि येत्या काही दिवसांत तसे करू. सध्या हा नियम न पाळल्यामुळे २१ प्रवर्तकांचे शेअर्स गोठवण्यात आले आहेत. प्रवर्तकांच्या यादीत पतंजली आयुर्वेदचा ३९.४ टक्के हिस्सा आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राचा डंका..! CCTN राबवणारं ठरलं देशातील पहिलं राज्य; जाणून घ्या याचा अर्थ!
Patanjali Foods' promoters say shareholding freeze won't impact company's financial position
Read @ANI Story | https://t.co/v5icDxP5wI#PatanjaliFoods #Freeze #WontImpact #FinancialPosition pic.twitter.com/rtCci1eCWj
— ANI Digital (@ani_digital) March 16, 2023
समस्या कशी निर्माण झाली?
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने डिसेंबर २०१७ मध्ये पतंजली फूड्स विरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली होती. पूर्वी ही कंपनी रुची सोया या नावाने ओळखली जात होती. जुलै २०१९ मध्ये, NCLT ने पतंजली आयुर्वेदाच्या संकल्प योजनेला मंजुरी दिली. सेबीचा नियम सांगतो की बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर ३ वर्षांच्या आत कंपनीमध्ये सार्वजनिक शेअरहोल्डिंग २५ टक्के किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी पतंजली फूड्सने मार्च २०२२ मध्ये FPO लाँच केला. याद्वारे ६.६२ कोटी शेअर्स जारी करण्यात आले आणि सार्वजनिक शेअरहोल्डिंग १९.१८% झाली, परंतु तरीही ते निर्धारित निकषांपेक्षा खूप मागे आहे.
गुंतवणूकदारांवर काय परिणाम होतो?
जरी एक्स्चेंजने केवळ प्रवर्तकांचे शेअर्स गोठवले असले आणि प्रकाशित शेअरहोल्डिंगसह स्टॉकमध्ये ट्रेडिंग चालू आहे. त्यामुळे ते थेट गुंतवणूकदारांना दिसत नसून, या कारवाईनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. NSE वर सकाळी ११.२५ वाजता पतंजली फूड्सचा शेअर ३.८७ टक्क्यांनी घसरून ९२७.०५ रुपयांवर होता आणि बीएसईवर ४.५७ टक्क्यांनी घसरून ९१७ रुपयांवर आला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!