

PM Internship Scheme 2025 : केंद्र सरकारच्या पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 अंतर्गत युवकांसाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रात इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे. नोंदणी लवकरच सुरू होणार असून, अधिकृत संकेतस्थळ आहे – pminternship.mca.gov.in
या क्षेत्रांमध्ये मिळणार इंटर्नशिप
- आयटी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
- बँकिंग आणि फायनान्स
- तेल, गॅस आणि ऊर्जा
- एफएमसीजी, फार्मा, ऑटोमोबाईल, कृषी
- सिनेमा, मीडिया, शिक्षण, पर्यटन
- उत्पादन, बांधकाम, केमिकल, ज्वेलरी इत्यादी
पात्रता
- वय: 21 ते 24 वर्षे दरम्यान
- कोणत्याही शालेय/कॉलेज शिक्षणात सध्या प्रवेश नसावा
- 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा पदवी (BA, BSc, BCom, BCA, BBA, B.Pharma इ.) पूर्ण केलेली असावी
- कौटुंबिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा जास्त नसावे (FY 2023-24)
या उमेदवारांना नाकारले जाईल
- IIT, IIM, NLU, IIIT, IISER मधून शिक्षण घेतलेले
- MBA, CA, CS, CMA, MBBS, PhD किंवा मास्टर्स डिग्री धारक
- जे NATS/NAPS किंवा इतर सरकारी इंटर्नशिप योजना पूर्ण केलेली आहे
- जे कोणत्याही सरकारी कौशल्य/इंटर्नशिप योजनेत सहभागी आहेत
नोंद घ्या
- योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे
- अर्ज करण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही
- अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ – pminternship.mca.gov.in
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!