पैशाची चणचण आहे, अकाऊंट रिकामी झालंय, तरीही मिळतील 10 हजार रुपये!

WhatsApp Group

तुमच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे नसले आणि तुम्हाला पैशांची गरज आहे, तर काळजी करायची गरज नाही. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जन धन अकाऊंट (PM Jan Dhan Yojana In Marathi) असणे आवश्यक आहे. केंद्रातील मोदी सरकारने 2017 मध्ये जन-धन खाते सुरू केले होते. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत बँक अकाऊंट उघडल्यावर चेकबुक, पासबुक, अपघाती विमा इत्यादी अनेक प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. या सर्वांसोबतच ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते. त्याच्या मदतीने, तुमच्या बँक अकाऊंटमध्ये बॅलन्स नसतानाही, तुम्ही जेव्हा गरज असेल तेव्हा पैसे काढू शकता.

प्रधानमंत्री जन धन योजना

या योजनेअंतर्गत झिरो बॅलन्सवर बँक अकाऊंट उघडली जातात. तुमच्या अकाऊंटमध्ये किमान बॅलन्स नसला तरी त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या योजनेत विम्यासह अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. झिरो बॅलन्सवर चालणाऱ्या या खात्याने कोट्यवधी लोकांना सेव्हिंग अकाऊंट, विमा आणि पेन्शन यासारखे फायदे सहज मिळण्यास मदत केली आहे.

अशा प्रकारे तुम्हाला मिळतील 10 हजार रुपये!

जन धन योजनेअंतर्गत, तुमच्या अकाऊंटमध्ये बॅलन्स नसतानाही तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन अकाऊंट किमान 6 महिने जुने असावे. असे नसल्यास, फक्त 2 हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे.

ओव्हरड्राफ्टवर व्याज

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेतल्यावर तुम्हाला बँकेला नाममात्र व्याज द्यावे लागेल. मात्र यातून अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांच्या किरकोळ गरजा सहज पूर्ण होतात. त्यांना कोणाकडे हात पसरावे लागत नाहीत. कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे आणि फाइल्स बनवण्याचा त्रास न घेता तुम्ही हे पैसे वापरू शकता.

हेही वाचा – LIC ची नवीन धमाकेदार योजना, आयुष्यभर गॅरंटीड रिटर्न्स मिळणार!

अकाऊंट कसे उघडायचे?

जन धन अकाऊंट उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. अकाऊंट उघडण्यासाठी किमान वय 10 वर्षे आहे. एवढेच नाही तर तुम्ही तुमचे जुने सेव्हिंग अकाऊंट जन धन मध्ये रूपांतरित करू शकता.

जन धन अकाऊंटमध्ये या सुविधा उपलब्ध

  • या योजनेअंतर्गत अकाऊंट उघडल्यानंतर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचे जीवन संरक्षण आणि जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळते.
  • तुमच्याकडे झिरो बॅलन्स असल्यास तुम्हाला 10,000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील मिळते.
  • अकाऊंट उघडल्यानंतर लगेच, तुम्ही 2000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टचा लाभ घेऊ शकता.
  • हे अकाऊंट कोणत्याही बँकेत उघडता येते.
  • यामध्ये तुम्हाला कमीत कमी बॅलन्स राखण्याची गरज नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment