

Post Office RD scheme 2025 : शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील जोखीम टाळून, सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या सरकारी योजनेत गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसची RD (Recurring Deposit) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
या योजनेची वैशिष्ट्ये :
- फक्त ₹100 पासून गुंतवणूक सुरू करता येते.
- कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा नाही.
- अल्पवयिनही खाते उघडू शकतो.
- मोबाइल बँकिंग आणि ई-बँकिंगद्वारे खाते उघडण्याची सुविधा
6.7% व्याजदरासह स्थिर परतावा
या योजनेत सध्या वार्षिक 6.7% व्याजदर लागू आहे. जर आपण दरमहा ₹50,000 गुंतवले, तर 5 वर्षांत एकूण ₹30 लाख गुंतवणुकीवर तुम्हाला जवळपास ₹5.68 लाख इतके व्याज मिळेल. एकूण रक्कम होते — ₹35,68,291!
5 वर्षांची मॅच्युरिटी आणि लवचिक अटी
- खाते किमान 5 वर्षांसाठी उघडले जाते
- 3 वर्षांनंतर बंद करण्याची मुभा
- मृत्यूनंतर नॉमिनी खाते चालू ठेवू शकतो किंवा रक्कम क्लेम करू शकतो
हेही वाचा – बॅडमिंटनचं शटल काढताना लागला विजेचा धक्का; १६ वर्षाच्या यशचा दुर्दैवी अंत, सीसीटीव्ही व्हिडिओत फुटेज
लोनची सुविधा
- किमान 12 महिने पैसे भरल्यानंतर जमलेल्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज मिळू शकते
- कर्जाची परतफेड एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये करता येते
करसवलत व TDS नियम
- IT Act 80C अंतर्गत ₹1.5 लाख पर्यंत करसवलत
- ₹10,000 पेक्षा जास्त व्याज मिळाल्यास 10% TDS लागू
- PAN न दिल्यास 20% TDS
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!