Adipurush Trailer : “अहंकाराच्या छातीत गाडा विजयाचा भगवा ध्वज…”, आदिपुरुषचा ट्रेलर रिलीज! पाहा

WhatsApp Group

Adipurush Trailer : जय श्री राम..तो क्षण आला आहे, ज्याची चित्रपटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते. बाहुबली अभिनेता प्रभासच्या बहुप्रतिक्षित आदिपुरुष या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रामकथेवर आधारित दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा बिग बजेट चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभास-राम, क्रिती सेनॉन-सीता, सनी सिंग-लक्ष्मण आणि सैफ अली खान-रावण यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आदिपुरुष ट्रेलर रिलीज

ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते जय श्री रामच्या घोषणा देत आहेत. प्रभासच्या चाहत्यांनी आधीच हा चित्रपट सुपर डुपर हिट घोषित केला आहे. त्यांच्या मते हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा हिट ठरेल. चाहत्यांनी प्रभासला मेगास्टार म्हटले आहे. लोकांचे म्हणणे आहे की, प्रभास या चित्रपटात रामची भूमिका साकारत नसून तो जगतो आहे.

हेही वाचा – Viral Photo : या फोटोत किराणा दुकान चालवणारा माणूस ‘अब्जाधीश’ माणसाचा सासरा आहे!

आदिपुरुष हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. हिंदी व्यतिरिक्त इतर अनेक भाषांमध्ये तो प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात वत्सल सेठही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारत आहे. प्रभास आणि क्रिती यांची जोडी पहिल्यांदाच स्क्रीनवर दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दोघेही एकत्र चांगले दिसत आहेत.

प्रभासच्या बाहुबली 2 नंतर कोणताही चित्रपट चाललेला नाही. साहो, राधेश्याम फ्लॉप ठरला. अशा परिस्थितीत आदिपुरुष हिट होणे प्रभासच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचे आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस निकालाचा परिणाम त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सवरही होणार आहे. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांमध्ये सालार, प्रोजेक्ट के आणि राजा डिलक्स यांचा समावेश आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment