Prayagraj Aircraft Crash : प्रयागराज शहरात आज सकाळी अचानक घडलेल्या एका थरारक घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. शहराच्या मध्यवर्ती भागात, के.पी. कॉलेजच्या मागे असलेल्या तलावात एक एअरक्राफ्ट कोसळल्याची घटना समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान हवेत बराच वेळ अस्थिर अवस्थेत घिरट्या घालत होते आणि अचानक इंजिन फेल झाल्यामुळे थेट तलावात कोसळले.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिस, प्रशासन आणि आपत्कालीन सेवांना माहिती दिली. काही मिनिटांतच फायर ब्रिगेडच्या गाड्या, रेस्क्यू टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
विमानातील दोन्ही क्रू मेंबर सुरक्षित
या भीषण अपघातात सर्वात मोठी दिलासादायक बाब म्हणजे विमानात असलेले दोन्ही क्रू मेंबर पूर्णपणे सुरक्षित आहेत. अधिकृत माहितीनुसार, हे एक एअरफोर्सचे मायक्रोलाइट ट्रेनी विमान होते, ज्यामध्ये जास्तीत जास्त दोन व्यक्ती बसू शकतात.
Update 📣: An Indian Air Force microlight aircraft made a precautionary crash landing in Prayagraj on Tuesday during a routine training sortie. Both pilots on board were safely recovered and did not sustain any serious injuries.
— Dr. Kiran J Patel (@kiranpatel1977) January 21, 2026
The aircraft was undertaking a scheduled training… pic.twitter.com/DWeuV01YaH
सेनेच्या प्राथमिक माहितीनुसार, पायलटने प्रसंगावधान राखत वस्ती असलेल्या भागाऐवजी तलावात इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू, संपूर्ण परिसर सील
अपघातानंतर प्रशासनाने तात्काळ संपूर्ण परिसर सील करून सुरक्षेची कडक व्यवस्था केली आहे. तलावाच्या आजूबाजूला नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
इंजिन फेल; चौकशीचे आदेश
प्राथमिक तपासानुसार, तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले, ज्यामुळे विमानाचा तोल गेला आणि हा अपघात घडला. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, एअरफोर्सकडून स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे.
बमरौली एअरपोर्टवरून उड्डाण
मिळालेल्या माहितीनुसार, हे ट्रेनी विमान प्रयागराजमधील बमरौली एअरपोर्टवरून उड्डाण करून काही किलोमीटर अंतरावरच अपघातग्रस्त झाले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी विमान कोसळले ते ठिकाण एअरपोर्टपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. प्रयागराज एअरपोर्ट हे सेंट्रल एअर कमांडचे मुख्यालय असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. सध्या एअरफोर्सकडून अधिकृत सविस्तर निवेदनाची प्रतीक्षा आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा